डॉ. मनोहर मोदी
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत शहरातून जाणा-या विजापूर -गुहागर या राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी जत साखर कारखान्याचे माजी संचालक, जत अर्बन बँकेचे सर्वेसर्वा व जत शहरातील ज्येष्ठ जनरल सर्जन डॉ. मनोहर मोदी यांनी केली आहे.
विजापूर- गुहागर हा राज्य मार्ग होता. तो राष्ट्रीय महामार्गात रुपांतर केला आहे. त्यामुळे या मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून साधी डागडुजी देखील केली जात नाही. या मार्गाचे काम 75 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र जत शहरातून जाणारया रस्त्याचे काम गेले वर्षभर रखडले आहे. त्या रस्त्याचे शहरातील भाग सोडून दोन्ही बाजू कड़ील काम बहुतांशी झाले असले तरी जत शहरातील सोलनकार चौक ते शिंदे पेट्रोलपंप, वळसंग कार्नर पर्यंतच्या रस्त्याचे काम थांबल्याचे दिसते. हा रस्ता शहरातील प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावरून पुणे, मुंबई, विजापूर, उमदी या मार्गावरील प्रमुख वाहतूक असते. याच रस्त्यावर एस.टी. स्टॅन्ड असल्याने या रस्त्यावर रात्रंदिवस मोठी वाहतूक होत असते. परंतू सध्या रस्त्याची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. हा रस्ता पादचारी लोकांसाठी तर मृत्यूचा सापळाच बनला आहे. लोकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. हा रस्ता चालण्यालायकदेखील राहिला नाही.
या रस्त्यावर भयानक खड्डे पडले असून वाहन धारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. या रोडवर दररोज अपघात होतच असतात; पण या मुख्य हायवे रस्त्याचे काम कित्येक महिने झाले पुर्ण होऊ शकत नाही. या कामासाठी कोणीही राजकारण न करता हा मुख्य रस्ता कसा चांगला होईल याची दक्षता घ्यावी. या रोडच्या कॉन्ट्रक्टरनी सुद्धा त्यांना घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करून रस्ता त्वरीत पुर्ण करावा व त्यासाठी या रोडच्या संबंधीत वरिष्ठ अधिकार्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पड़ता लोकांची सोय शासनाच्या अटींचे पालन करून या मुख्या रस्त्यांचे काम त्वरीत सुरू करावे, अशी मागणी येथील मोदी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. मनोहर मोदी यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment