घातापाताचा संशय
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील कोंते बोबलाद येथील सायकल दुरुस्ती दुकानदार शहानूर खाजासाब मकानदार (वय -25,रा.कोतेंबोबलाद)याचा मृतदेह गावातील ललिता मारूती मंचद यांच्या घरासमोर संशयास्पदरित्या आढळून आला.याबाबत उमदी पोलिसांत खाजासाब मकानदार यांनी फिर्यादी दिली आहे. यात त्यांनी मुलांचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
Friday, January 18, 2019
Thursday, January 17, 2019
'जत’ला रोजगार देता का रोजगार?
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात रोजगाराच्या दृष्टीने आवश्यक ती साधनेच उपलब्ध नसल्याने जतची अवस्था बिकट झाली आहे. यापूर्वी इतिहासकालीन युगात जतच्या वैभवाचे,भरभराटीचे विविध प्रकारे वर्णन केले जायचे. इथे सोन्याचा धूर निघत, असे बोलले जायचे. पण त्याच जतवर कुणी रोजगार देता का रोजगार? असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सांगली जिल्ह्यातल्या जि. प. व महसुलाच्या जागा कधी निघणार?
तरुणांना लागले नोकर भरतीचे वेध
जत,(प्रतिनिधी)-
काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्य व केंद्र सरकारकडून विविध विभागातील रिक्त पदे भरण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळेच आजघडीला विविध विभागातील तब्बल 24 हजार 971 पदे भरण्यात येत आहेत. त्यासाठी जाहिरातीही प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु, कला शाखेतील पदवीधर बोटांवर मोजण्याइतपत पदांसाठीच पात्र ठरत आहेत. या भरतीमध्ये कला शाखेतील पदवीधरांसाठी जागाच नसल्याने त्यांचा मात्र आता धीर सुटू लागला आहे. तसेच राज्यातील विविध विभागातील रिक्त जागांच्या जाहिराती प्रसिध्द होऊ लागल्या आहेत. सांगली जिल्हा परिषद आणि महसूल विभागातील जागा कधी निघणार, असाही सवाल स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे.

Wednesday, January 16, 2019
घोषणांचा पाऊस; अंमलबजावणीचा दुष्काळ!
जत,(प्रतिनिधी)-
संपूर्ण पावसाळ्यात पावसाने अवकृपा दाखविल्यामुळे आजवर न पडलेला दुष्काळ यंदा जत तालुक्यात पडला आहे. याचवेळी मात्र सरकारकडून दुष्काळी उपाययोजनांच्या घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणीचाच दुष्काळ असल्याचे चित्र अनुभवायला येत आहे. उन्हाचा तडाका जसा वाढत आहे, तशाच दुष्काळाच्या झळादेखील तीव्र होत आहेत. यातून स्वतः ला वाचण्यासाठी शेतकरी सरकारच्या मदतीकडे आशा लावून बसले आहेत.

मराठी हीसंस्काराची भाषा-डॉ.दिनकर कुटे
जत,(प्रतिनिधी)-
ज्ञानेश्वर पासून ते आजपर्यंत मराठी साहित्याने अनेक पिढ्यांना संस्कारीत केले आहे. मराठी भाषेत मधुरता आणि गोडवा ओतप्रोत भरलेला आहे. मराठी भाषा ही संस्काराची भाषा आहे,म्हणून मराठी माणसाने मराठी भाषेचे अध्ययन केले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. दिनकर कुटे यांनी केले.

बेळोंडगी येथील ग्रामपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा
महिलांची पाण्यासाठी धावाधाव
जत,(प्रतिनिधी)-
बेळोंडगी ( ता.जत ) येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावाला पाणी पुरवठा करणारी योजना कुचकामी ठरली आहे. त्यामुळे नागरीकांना तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे . टँकरची मागणी करुनही तो मिळाला नाही. तहसिलदार सचिन पाटील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बेळोंडगी गावात येणार असल्याचे समजताच गावातील महिलांनी टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू करावा, या मागणीसाठी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून, ठिय्या मारला व शासनाचा निषेध केला.

Tuesday, January 15, 2019
गटबाजी आणि पडोळकरांच्या विरोधकाच्या भूमिकेमुळे भाजप अडचणीत
जत तालुक्यामध्ये लोकसभेचे पडघम आतापासूनच वाजू लागले
असून काँग्रेस कोमात, तर भाजप जोमात, असे चित्र पाहायला मिळत असले तरी भाजपमध्ये पडलेल्या दोन गटाने भाजप अडचणीत
असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्याचबरोबर गोपीचंद पडळकर यांनी
घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला अडचणीचे होऊ शकते,
असे सध्या तरी चित्र दिसत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)