Thursday, December 12, 2019

चाळीस लाख मुले नशेच्या विळख्यात

देशभरातील दहा ते १७ वयोगटातील सुमारे ४0 लाख मुले अंमली पदार्थांचे सेवन करतात, तर ३0 लाख मुलांना दारूचे व्यसन जडले आहे, अशी माहिती सरकारतर्फे लोकसभेत देण्यात आली.सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रतनलाल कटारिया यांनी प्रश्नाचे लेखी उत्तर देताना वरील माहिती दिली. २0१८ च्या राष्ट्रीय सर्वेक्षणातील माहितीनुसार, या वयोगटातील सुमारे ३0 लाख मुले व्यसनासाठी 'इनहेलर'चा वापर करतात. २0 लाख मुले भांग आणि वेदनाशामक औषधांचे व्यसन करतात, तर चार लाख मुले अँम्फेटामाइन-टाइप स्टिम्युलन्ट (एटीएस) म्हणजेच विशिष्ट प्रकारची उत्तेजके वापरतात आणि दोन लाख मुले कोकेन आणि ग्लानी आणणारी औषधे घेतात, अशी माहिती त्यांनी दिली.

राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेस पुरस्कार


जत,(प्रतिनिधी)-
 राजे रामराव महाविद्यालय, जत ला शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शै. वर्ष २०१८-१९ साठी उत्कृष्ठ महाविद्यालय व डाॅ. राजेंद्र लवटे यांना उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी म्हणून सांगली जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती प्र. प्राचार्य डॉ. विठ्ठल ढेकळे यांनी दिली.

Tuesday, December 10, 2019

महाराष्ट्रात बलात्काराचे २२ हजार खटले प्रलंबित

हैदराबाद एन्काऊंटरचे देशभरात स्वागत होत आहे. याचे कारण म्हणजे न्याय मिळण्यात होणारा विलंब. निर्भया प्रकरणालाही ६ वर्षे लोटले तरी अजूनही न्याय झाला नाही. गुन्हा केल्यावर तातडीने आरोपीला अटक व्हायला पाहिजे. तेवढय़ाच तातडीने त्यानं केलेल्या गुन्ह्याची शिक्षाही मिळाली पाहिजे. महाराष्ट्रात जवळपास २२ हजार बलात्काराचे खटले प्रलंबित आहेत. पीडितांना न्याय मिळणे सोपे राहिले नाही, हे सांगण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे.

सांगली जिल्ह्याची साहित्य संमेलन परंपरा

सांगली,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्याला साहित्य आणि साहित्यिकांची मोठी परंपरा आहे. प्रसिध्द लेखक,कवी आणि 'गीत रामायण' चे रचनाकार गदिमा यांची ही जन्मभूमी आहे. त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हटले जाते. बाबाखान दरवेशी, डॉ. सरोजिनी बाबर असे मोठे लेखक,लेखकांचा गोतावळा इथे आहे. आज शेकडो साहित्यिक शारदेची उपासना करताना दिसत आहेत. याशिवाय सांगली जिल्ह्यातील ग्रामीण आजही मोठ्या प्रमाणात छोटी मोठी साहित्य संमेलने भरवली जातात. यातून नवोदितांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे आज शेकडो लेखक लिहिते झाले आहेत. मोठ्या सांगली जिल्ह्याची साहित्य संमेलन परंपरा आहे.

Monday, December 9, 2019

एकुंडी यल्लम्मा यात्रा उत्साहात

जत,(प्रतिनिधी)-
 एकुंडी येथील रेणुका देवीची यात्रा आज उदं ग आई उदंऽऽ...च्या जयघोषात पारंपरिक उत्साहात झाली.
सकाळी सहा पासून सुरू असलेली रांग रात्री दहापर्यंत कायम होती. सरपंच बसवराज पाटील यांच्यासह स्वयंसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या नियोजनामुळे यात्रा सुरळीत पार पडली. हजारो भाविकांनी श्रद्धेने देवीला आंबील आणि कांदाभाकरीचा नैवेद्य अर्पण केला. अनेक भाविकांनी रानमाळावर बसून नैवेद्याचा आस्वाद घेतला. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास मानाचे जग पाटील वाड्यातून बाहेर पडल्यानंतर पुजारी यांनी किचाचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर यात्रेची सांगता झाली.

Sunday, December 8, 2019

थोर व्यक्तींच्या चरित्रांची युवा पिढीने पारायणे करावीत

प्राचार्य डॉ. विठ्ठल ढेकळे
जत,(प्रतिनिधी)-
आजच्या युवापिढीचे वाचन कमी असून त्यांनी आपल्या आयुष्याची जडणघडण करण्यासाठी थोरामोठ्यांच्या चरित्रांची पारायणे करावीत असे मनोगत राजे रामराव महाविद्यालय, जतचे  प्राचार्य डॉ. विठ्ठल ढेकळे यांनी व्यक्त केले. ते महाविद्यालयातील महाराष्ट्र विवेक वाहिनी विभाग व श्रीमंत विजयसिंहराजे डफळे ज्ञानस्त्रोत केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

जत पूर्व भागात उमदी येथे मिनी एमआयडीसीची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
    जत तालुका विस्ताराने मोठा असल्यामुळे संख आणि उमदी येथे स्वतंत्र तहसिल कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तसेच जतचा हा पूर्व भाग हा स्वतंत्र तालुका होण्याचा मार्गावर आहे .सध्य स्थितीत प्रत्येक तालुक्याची ठिकाणी लघु आणि मध्यम औद्योगिक वसाहतीची स्थापना करण्यात आली आहे. त्याच्या अनुषंगाने उमदी येथे सुद्धा एमआयडीसी स्थापना करणे आवश्यक आहे.  जत पूर्व भागातील लोकांची मागणी आहे.