Tuesday, December 31, 2019

रांगड्या तमाशाची कसदार भूमी


सांगली संस्थानचे श्रीमंत अप्पासाहेब ऊर्फ चिंतामणराव पटवर्धनांच्या दरबारी अनेकजण आपली कला सादर करीत होते. नायकिणीची गाणी, राधेचा नाच, गोवेकरणीची गाणी आणि विशेष म्हणजे तमाशा लावण्याचे फड त्यामध्ये असत. राधा रणमल्ली, इमाम, आवडी, चिमणी, बक्षीची ,रमा, गुलाबी, वीणा, नायकिणी, फकिरा अशा अनेक हरहुन्नरी नर्तिका दरबारी येऊन आपली अस्सल कला सादर करून जात. सांगली जिल्ह्यातील तमाशा परंपरा 18 व्या शतकापासून ते आजतागायत जिवंत आहे. पूर्वी 1918 मध्ये शेटफळे (ता. आटपाडी0 येथील हौशी तमाशा कलावंत वामन लांडगे यांनी बाबू गहिना लोकनाट्य तमाशा मंडळाची मूहुर्तमेढ रोवली. त्यानंतर तमाशा कलेला नवे बळ मिळत गेले.नंतर 1920 मध्ये बनपुरी (ता. आटपाडी) चा रांगडे तमाशा कलावंत म्हणजे आवजी कृष्ण अहिवळे यांनी तमाशा सुरू केला.
1935 मध्ये गोमेवाडीच्या नाना वामन सोहनी यांनी लोकनाट्य तमाशा मंडळाची हालगी वाजवली. या कालखंडात छेळबराव मैना हा वग खूपच गाजला होता. याच कालखंडात जो तमाशा गाजला तो शाहीर पठ्ठे बापूराव ऊर्फ श्रीधर बाळकृष्ण कुलकर्णी यांचा.

देशात वृक्ष, वनक्षेत्रात झपाट्याने वाढ

महाराष्ट्रात १८ वर्षांत १८ कोटी वृक्षवाढ
महाराष्ट्रात फळबागांचे क्षेत्र वाढले आहे. महाराष्ट्रात आंबा, बोर आणि डाळिंबाच्या तीन कोटी वृक्षांची लागवड होते आणि सुमारे ९0 ते ९५ टक्के वृक्ष जगतात. गेल्या १८ वर्षांत महाराष्ट्रात १८ कोटी वृक्ष वाढले आहेत.आशेचे किरण दिसते आहे
देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी १६.५१ टक्के पहाडी क्षेत्र आहे. येथील वन क्षेत्रातही ५४४ चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. देशातील आदिवासी जिल्ह्यांतील एकूण वन क्षेत्र चार लाख २२ हजार ३५१ चौरस किलोमीटर आहे. ते एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३७.५४ टक्के आहे. सध्याच्या मूल्यांकनानुसार, ७४१ चौरस किलोमीटरने हे क्षेत्र घटले असले तरीही बाहेरच्या क्षेत्रात मात्र एक हजार ९२२ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. देशातील बांबूचे क्षेत्रफळ अंदाजे एक लाख ६0 हजार 0३७ चौरस किलोमीटर आहे. त्यात तीन हजार २२९ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. आगीच्या प्रमाणात २0१८ पेक्षा २0 टक्क्यांनी घट झाली आहे, असेही या अहवालात नमूद केले आहे. यामुळे आशेचे किरण दिसत आहे.

Sunday, December 29, 2019

सांगलीचा झेंडा देशात लावणारे सोंगी भजन

अनेक खेड्यांतून थोड्याफार फरकाने उत्तररात्रीपर्यंत हा कलाप्रकार रंगलेला असे. लोकरंजनातून नीतीचे व संस्कृतीचे शिक्षण देणारी ही लोककला होती. या कलाकारांनी एकनाथी भारुड, रामायणातील कथाव्यवहारातील व्यक्तिरेखा निवडून कला प्रकार सादर केला. प्रसंगानुरुप गीते व सोंगेही घेतली जायचीसांगली जिल्ह्यात बर्याच ठिकाणी सोंगी भजन किंवा सोंगी रामायण सादर करताना लोककलाकार दिसतात. तुरची ढवळी येथे शामराव पाटील, सुभाष पाटील, बाळासाहेब पाटील यांनी हा कलाप्रकार भक्तिभावाने जोपासला आहे.सोंगी भजनाद्वारे संत वाड्मयाचे सादरीकरण करीत असतात.तासगाव तालुक्यातील खुजगाव येथील जाधव मंडळी सोंगी भजनाचे उत्तम सादरीकरण करतात. चोपडीवाडी व सोनी येथील लाला मास्तर यांनीही हा लोककला प्रकार अतिशय वैशिष्ट्यपूर्णपणे हाताळला. कवलापूर येथील दिलीप झेंडे, उपळावी येथील चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब शिंदे, कुपवाड येथील सुतार हवालदार आदी कित्येक लोककलाकारांची नावे सांगता येतील.मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथील सोंगी रामायणाने अनेक राज्याचा दौरा करून ही लोककला देशाच्या नकाशावर नेली.

Saturday, December 28, 2019

मुलींच्या शिक्षणात विवाहाचा अडथळा

देशात बालविवाहाला बंदी आहे. तरीही काही राज्यांमध्ये ही कुप्रथा आजही कायम आहे. त्यामुळेच तब्बल १४ टक्के मुलींना याच कारणामुळे शाळा सोडावी लागत असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय पातळीवरील सर्वशिक्षण अभियान आणि शिक्षण हक्क कायद्याच्या दोन दशकांच्या प्रयत्नांनंतरही देशभरातील व शहरातीलही मुलांच्या शाळागळतीचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू असला तरीही तब्बल १४ टक्के मुलींना उमलत्या वयातच विवाहबंधनात अडकवण्यात येत असल्याने त्यांना शिक्षण सोडावे लागत असल्याचे दाहक वास्तव राष्ट्रीय नमुना चाचणीच्या अहवालातून समोर आले आहे.
शाळागळतीचे हे प्रमाण २३. ८0 टक्के मुले आणि १५.६0 टक्के मुलींना शिक्षणातच रस नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे सामाजिक बंधनांमुळे मुलींना शिक्षण घेता येत नाही, तर शिक्षण घेऊनही काहीच फायदा नाही, अथवा ते बालकांना शिक्षणाप्रती ओढ निर्माण करण्यात अपुरे पडत असल्यानेच शिक्षण सोडून देण्याचे प्रमाण वाढत असल्याचे या पाहणीच्या निष्कर्षातून समोर आले आहे.

Friday, December 27, 2019

सलमानची चौथीत असताना शाळेतून हकालपट्टी

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सलमान खान याची चौथीत असताना शाळेतून हकालपट्टी करण्यात आली होती. खुद्द सलमाननेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला. 'द तारा शर्मा शो' या कार्यक्रमात त्याने हजेरी लावली होती. आपल्या बालपणीच्या बर्‍याच गोष्टी सलमानने या मुलाखतीत सांगितल्या.

Thursday, December 26, 2019

शालेय पोषण आहारात शिवशाही थाळीचा समावेश करा

जत,(प्रतिनिधी)-
शासनाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या आहारातील भ्रष्टाचार व गैरव्यवहारास आळा घालण्यासाठी या विद्यार्थ्यांना शिवशाही थाळीचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक समितीचे शिक्षक  नेते मच्छिंद्र ऐनापुरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Tuesday, December 24, 2019

कर्मचार्‍यांचे अप-डाऊन थांबणार तरी कधी?

जत,(प्रतिनिधी)-
शासनाने शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांनी मुख्यालयी राहून कर्तव्य बजवावे, असा आदेश काढला आहे. या आदेशाची जत तालुक्यात सर्रास पायमल्ली होताना दिसून येत आहे. यामध्ये शिक्षक, शिक्षिका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आदींचा समावेश आहे. कर्मचारी मुख्यलयी राहत नसल्याने जनतेची अनेक कामे खोळंबली जात आहे.