Thursday, October 31, 2019

यंदाही नाही मिळाली 'आशा' ला दिवाळी भेट

जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील 'आशा' कर्मचार्‍यांना यंदाही भाऊबिजेची भेट (मानधन) मिळाली नाही. त्याच प्रमाणे गटप्रवर्तकांनाही कोणतीही दिवाळी भेट देण्यात आलेली नाही.अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट देण्यात येते. हा निर्णय ग्रामविकास, महिला व बालविकास खात्याकडून घेण्यात येतो. मात्र, प्रत्यक्ष घरोघरी जाऊन बाळांचे लसीकरण, गरोदर मातांच्या नोंदणीसह इतरही सर्वेक्षण करणार्‍या आशांच्या पदरी मात्र वषार्नुवर्षे भाऊबिजेची भेट पडलीच नाही.

सुखी आयुष्याला कंटाळून आत्महत्या

एखादी वाईट गोष्ट झाली किंवा नैराश्यामधून आत्महत्या करणार्‍यांच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो पण पुण्यामधील एका वृद्ध दांपत्याने सुखी आयुष्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपले आता या जगात काहीच काम नाही त्यामुळे आपण आयुष्य संपवायला हवे या भावनेतून वृद्ध दांपत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. दिवाळीच्या आधी घडलेल्या या घटनेमध्ये वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला असून महिलेला वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.

खाकी वर्दी आहे; पण सन्मान नाही!

होमगार्डसना सेवेत सामावून घेण्याची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
पोलिस दलाला अटीतटीच्या काळात महत्त्वाचे पात्र ठरणार्‍या होमगार्डची व्यथा कुणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करून करीत नाही. राज्यात 42 हजार होमगार्ड्स आहेत. त्यांना कधीही, केव्हाही कामावर बोलावले जाते. त्यांची वर्षातून दोन-अडीच महिने भरतात. त्यात त्यांना मिळत असलेल्या तुटपुंज्या मानधनात आपले समाधान करून घ्यावे लागते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता लागलेली असताना होमगार्ड असूनसुद्धा त्यांना अभिमान बाळगता येत नाही. त्यामुळे ही ओळख लपवत वेठबिगारी म्हणून कामावर जावं लागतं. स्वत:साठी, स्वत:च्या कुटुंबासाठी पाणावलेल्या डोळ्यांनी प्रत्येक होमगार्ड आपली व्यथा मांडताना दिसून येतो.

सावधान!मित्राने पाठवलेली एखादी लिंक घातक ठरू शकते

जत,(प्रतिनिधी)-
सणवार आले की सोशल मीडियावर एखादी लिंक पाठवून मित्रांची मज्जा घेणे ही आजकालच्या काळात खूपच चलनाची गोष्ट झाली आहे. गणेशोत्सवापासून झालेली सणांची सुरुवात दिवाळी आणि पुढे नूतन वर्षापर्यंत सुरूच राहते. यात सोशल माध्यमांवर अग्रेसर असलेले 'नेटकरी' सातत्याने काही ना काही नित्यनवीन आणतच असतात. गंमत म्हणून अधिकाधिक लोक त्या पाहतातही. पण नेमकी हिच गोष्ट घातक ठरू लागली आहे.

शिक्षकांना कर्तव्यावर असताना ओळखपत्र लावणे होणार बंधनकारक


जत,(प्रतिनिधी)-
यापुढे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी 100 टक्के अनुदानित शाळांतील वर्ग 1 ते 8 च्या शिक्षकांना त्यांच्या खिशावर ओळखत्र लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना शालेय शिक्षण विभागासह प्राथमिक शिक्षण परिषदेने पाठविले आहे.

आजपासून बदलणार बँकांचे नियम, वेळापत्रक


जत,(प्रतिनिधी)-
आज १ नोव्हेंबरपासून देशभरात अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. या नव्या नियमांचा दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येतआहे. नव्या नियमांबाबत जागरुक राहणे गरजेचे असून, या नव्या बदलांमुळे अनेकांना नुकसानही सहन करावे लागणार आहे.

Wednesday, October 30, 2019

एक पणती... व्यसनमुक्तीसाठी!

बाबरवस्ती शाळेत 'तंबाखू मुक्त शाळा' उपक्रम
जत,(प्रतिनिधी)-
सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये 'तंबाखू मुक्त शाळा' अभियान राबवले जात आहे. या उपक्रमाअंतर्गत जत तालुक्यातील पांडोझरी भागातील बाबरवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ' तंबाखू मुक्त  शाळा' अभियांतर्गत दिवाळी सणानिमित्त 'एक म्हणती... व्यसनमुक्ती'साठी हा उपक्रम राबविण्यात आला.