Friday, October 25, 2019

तंटामुक्त, गाव समित्या कागदावरच

जिल्ह्यातील स्थिती;गावोगावी भांडणे, तंटे सुरूच
जत,(प्रतिनिधी)-
गाव तंटामुक्त, निर्मलग्राम होतात, दारुबंदी केली जाते. मात्र खऱ्या अर्थाने ही यशस्विता कागदोपत्रीच दिसून येते. जी गावे तंटामुक्त झाली आहेत,त्याच गावात हाणामाऱ्या होत आहे. समित्या फक्त कागदावरच राहिल्या आहेत.
स्वच्छता अभियान असो किंवा निर्मलग्राम असो किंवा तंटामुक्त गाव असो अशा विविध योजनांसाठी गावोगावी अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र या समित्यांचा काहीच उपयोग गावांना होताना दिसत नाही. काही वर्षांपूर्वी जत तालुक्यातील बहुतांश गावे निर्मलग्राम झाली. मात्र आज या गावाची परिस्थिती पाहण्याजोगी झाली आहे.

Thursday, October 24, 2019

बँके मॅनेंजर ते आमदार

जतच्या राजकारणात आणि समाजकारणात सावंत घराण्याचे योगदान खूप मोठे आहे. गेल्या अनेक दशकापासून हे घराणे जतेच्या राजकारणात मातब्बर समजले जाते. परंतु याच घराण्याचे तिसरे वारसदार विक्रमसिंह सावंत यांनी गेल्या पंधरा वर्षाच्या राजकारणात भाजप तथा विलासराव जगताप यांच्या गटाला झुंज देत अखेर तालुक्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारती बँकेचा शाखाधिकारी, जिल्हा बँकेचा संचालक, जिल्हा परिषदेचा सदस्य ते आमदार पदापर्यंत त्यांनी केलेला प्रवास थक्क करणारा आहे. विक्रमसिंह बाळासाहेब सावंत यांनी ऑक्टोबर २०१९ च्या निवडणुकीत जत मतदारसंघातून तब्बल ३५ हजाराचे मताधिक्य घेत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बी. कॉम. चे शिक्षण पूर्ण केलेले सावंत हे सुरुवातीस जतच्या राजकारणात सक्रीय नव्हते. भारती बँकेमध्ये शाखाधिकारी म्हणून नोकरी करीत असतानाच, त्यांनी गेल्या पंधरा वर्षापूर्वी जतेत सक्रीय राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीस त्यांनी उमदी जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढवली.

महाराष्ट्रातील संस्कृती वैभव :किल्ला

महाराष्ट्र संस्कृतीत गडकोटांना प्राचीन स्थान आणि महत्त्व आहे. आमच्या पराक्रम आणि संघर्षांची ही प्रतीके आहेत. या गडकोटांच्या स्मृती जपाव्यात आणि पूर्वजांच्या पराक्रमाच्या नौबती पुन्हा घडाव्यात जणू यासाठीच या किल्ले बनवण्याच्या परंपरेचा उदय झाला असावा. दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बांधणीची प्रथा कशी सुरू झाली, याबाबत ठोस तपशील उपलब्ध नाहीत. मात्र, किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्याचा लहान मुलांचा सुट्टीतील विरंगुळा जणू परंपराच बनला आहे.

'जत'ला 'विक्रम पर्वा'ची सुरुवात

विक्रमसिंह सावंत 35 हजार  मताधिक्याने विजयी
जत,(प्रतिनिधी)-
काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांनी भाजपचे आमदार विलासराव जगताप यांचा दारुण पराभव करत काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून दिले. जत विधानसभा मतदारसंघात भापजची सलग पंधरा वर्षे सत्ता होती, ती आता संपुष्टात आली आहे. विक्रमसिंह सावंत यांना या निवडणुकीत 87 हजार 184 मते मिळाली तर विलासराव जगताप यांना 52 हजार 510 मते मिळाली. तिसऱ्या आघाडीच्या डॉ.रवींद्र आरळी यांना 28 हजार 715 मिळाली. यात विक्रमसिंह सावंत 34 हजार 674 इतक्या मोठ्या फरकाने विजयी झाले.

Wednesday, October 23, 2019

सर्वसामान्यांमध्येही खादीची क्रेझ वाढली

जत,(प्रतिनिधी)-
दिवाळीसाठी कपड्यांची खरेदी करत असताना तरुणांसह तरुणींमध्ये खादीची कपडे खरेदी करण्याकडे वाढता कल असल्याचे पाहावयास मिळत होते. विशेष म्हणजे खादीच्या लिनन कॉटनकिंग, केंब्रिज या ब्रँडच्या खादीला मागणी वाढली असल्याचेही दुकानदारांकडून सांगण्यात आले. पारंपरिक कुर्ते, जीन्ससह बेसकोट व प्रिंटेड रेडिमेडला खरेदीवर ग्राहकांचा जोर होता.
सध्या हातमागावर तयार होणार्‍या मुलायम कपडे वापरण्याचा ट्रेंड वाढत आहे. त्यालाही कारणही तसेच आहे.

यंदा तुळशी विवाहानंतर ४६ शुभमुहूर्ताचा योग


जत,(प्रतिनिधी)-
दिवाळी सणाच्या नंतर यंदा कर्तव्य आहे, असे म्हणणार्‍यांना आता तुळशी विवाह झाल्यानंतर आठ दिवसानंतर लग्नाचे बाशिंग बांधता येणार आहे. परंतु यंदा डिसेंबर महिन्यापासून गुरुचा अस्त असल्यामुळे महिनाभर शुभ मुहूर्त नाहीत. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४६ शुभमुहूर्त आहेत. येत्या २७ तारखेला लक्ष्मीपुजन, तर १२ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह होणार आहे.

Tuesday, October 22, 2019

ग्रुपमध्ये सामील करून घेण्यासाठी आता युजरची परवानगी

व्हाट्सएपचे नवे फिचर
जत,(प्रतिनिधी)-
 दररोज कुणीतरी आपल्याला नवीन व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून घेतो. त्यामुळे ग्रुप्सची संख्या खूपच वाढते. आपली इच्छा नसली तरीही लोक युजरला आपापल्या ग्रुपमध्ये सामील करून घेतात. आता हे टाळता येणार आहे. मात्र आता युजरने परवानगी दिली तरच कुणीही नव्या ग्रुपमध्ये समाविष्ट करू शकेल. व्हॉट्सअॅपमध्ये हे नवे फीचर आता येणार आहे.