Thursday, May 9, 2019

पाणी, चार्‍यासाठी दुष्काळग्रस्तांचा टाहो

अनेक राजकीय पक्ष,संघटनांचे आंदोलनाचे इशारे
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात पाणी व चार्‍याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. पूर्व भागातील लोकांना पिण्यासाठी पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. जनावरे चार्‍यासाठी तडफडत आहेत. पिकांची होरपळ सुरू आहे. सिंचन योजनाद्वारे तलाव भरून देऊ, असे आश्‍वासन देणारे नेते निवडणुकीनंतर गायब झाले आहेत. दुष्काळग्रस्तांना तातडीने दिलासा देण्यासाठी गावो-गावी टँकरची संख्या वाढविणे, चारा छावण्या मोठ्या प्रमाणात सुरू करणे हाच उपाय आहे. पण शासन व प्रशासन याकडे ढुंकूनही बघायला तयार नाही. यामुळे दुष्काळी जनतेतून संतापाची लाट उसळली आहे.

धक्‍कादायक... राज्यात रोज 8 शेतकरी करतात आत्महत्या


जत,(प्रतिनिधी)-
समृद्ध महाराष्ट्रातील शेतकरी मात्र दु:खाच्या छायेत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. 2014 ते 2018 या पाच वर्षांच्या काळात  14034 शेतकर्‍यांनी जीवन संपवले आहे. राज्य सरकारने 2017 साली जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेनंतरही 4500 शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

Tuesday, May 7, 2019

जत तालुक्यातील शेतकरी शासन योजनांच्या निधीपासून वंचित


जत,(प्रतिनिधी)-
 लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या केंद्राच्या शेतकरी सन्मान आणि राज्य सरकारच्या दुष्काळ निधीपासून आजही जत तालुक्यातील अनेक शेतकरी वंचित आहेत. वैयक्तिक लाभाच्या या योजनेस आचारसंहितेचा अडसर असल्याने लोकसभा निवडणूक काळात ही योजना थांबली होती. मात्र आता निवडणूक झाली आहे. दुष्काळाचे मोठे संकट शेतकर्यांसमोर आहे. अशा वेळी ही योजना तातडीने सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

19 मेपर्यंत क्षयरोग शोधमोहीम


जत,(प्रतिनिधी)-
सांगली  जिल्ह्यात 6 ते 19 मे कालावधीत क्षयरोग शोधमोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी यांनी दिली आहे. जिल्ह्यात 34 हजार घरांमधील दीड लाख लोकांचा सर्वे करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सन 2025 पर्यंत देशातून क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठरविलेले समोर ठेवले आहे. या सक्रीय क्षयरुग्ण शोधमोहिमेमध्ये दोन आठवड्याचा खोकला, रात्रीचा ताप, भूक मंदावणे, वजन कमी होणे, बेडक्यातून रक्त पडणे, तसेच गाठी, गंडमाळा यासारखी लक्षणे असणार्या संशयित क्षयरुग्णांच्या याद्या तयार करून त्यांची तपासणी केली जाणार आहे. याकरिता झोपडपटटी, मिल कामगार, स्टोन क्रशरवरील कामगार, असंघटित कामगार, बेघर, अनाथ आश्रम, वृध्दाश्रम, अतिजोखमीचे रुग्ण यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

जत तालुक्यातील 17 तलाव कोरडे ठणठणीत


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात भीषण दुष्काळ जाणवत असून पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष्य आहे. तालुक्यातल्या तलावांमध्ये फक्त 2 टक्के पाणीसाठा असून 28 तलावांपैकी तब्बल 17 तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी वाढत असून सध्या 86 गावांनामधील सव्वा दोन लाख लोकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेच्या संचालकपदी बिरादार


जत,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी संख (ता जत) येथील गुरुबसव विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथील प्रा. सुभाष मल्लकाप्पा बिरादार यांची निवड करण्यात आली आहे.

मुचंडी येथे चारा छावणी सुरू करा


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात दुष्काळाची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. मुचंडी व परिसरातील अनेक गावांत चाराटंचाईची भीषण अवस्था निर्माण झाली असून शेतकर्यांना जनावरे विकण्याची वेळ आली आहे. याची दखल घेऊन तातडीने चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी मुचंडीचे सरपंच अशोकराव पाटील यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे केली.