Tuesday, April 14, 2020
उमदी पोलीस ठाण्याकडे 26 पदे रिक्त
32 पोलिसांची 48 गावांवर नजर
उमदी,(प्रतिनिधी)-
सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवरचा ताण वाढला असून त्यांना 24 तास ड्युटी सांभाळावी लागत आहे. संचार बंदी लागू करण्यात आल्याने पोलिसांना जमाव होऊ नये, म्हणून सतर्क राहावे लागत आहे. जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याकडे असलेल्या पोलिसांच्या कमतरतेमुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण आला आहे. याठिकाणी तब्बल 26 जागा रिक्त आहेत.
Monday, April 13, 2020
(क्राइम स्टोरी) ऐश्वर्याने तिच्या नवऱ्याला का मारले?
नरेशचा मृतदेह 2 दिवसानंतर एका विहिरीत सापडला. दुर्गंधी पसरला होता, त्यानंतरच लोकांना कळले की विहिरीत एक मृत शरीर आहे. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. नरेशची पत्नी ऐश्वर्या हिने आपला नवरा बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत केली केली होती. नरेश हा शहरातील एक प्रसिद्ध उद्योजक होता. वडिलांच्या मृत्यूनंतर तो संपूर्ण व्यवसाय हाताळत होता, त्या मुळे तो खूप व्यस्त होता. सकाळीदहा वाजता घराबाहेर पडला की, रात्री दहा नंतरच घरी परतायचा.
Saturday, April 11, 2020
(क्राईम स्टोरी) मेहंदीचा रंग
आम्ही चार मैत्रिणी बरीच चेष्टा-मस्करी करत असू. इंजिनिअरिंग कॉलेजचे हे शेवटचे वर्ष होते. आमची एकमेकांपासून दूर होण्याची वेळ हळूहळू जवळ येत होती. त्यामुळे आम्ही सर्वजणी या वेळी एकच प्रयत्न करत होतो की, मस्तीचा कोणताही क्षण दवडू द्यायचा नाही.
"ऐक संगीता, मी आज तुझ्याबरोबर येऊ शकणार नाही. माझी समीरबरोबर आईस्क्रीम पार्टी आहे," जुही हसत हसत म्हणाली.
"ऐक संगीता, मी आज तुझ्याबरोबर येऊ शकणार नाही. माझी समीरबरोबर आईस्क्रीम पार्टी आहे," जुही हसत हसत म्हणाली.
Friday, April 10, 2020
मृत्यूंपैकी ८0 टक्के मधुमेह व उच्च रक्तदाबाचे पेशंट
सांगली,(प्रतिनिधी)-
आपल्यासाठी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी बनली असून कोरोनाच्या महामारीचा मोठा फटका मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना बसलेला दिसतो. प्रामुख्याने मुंबई-पुण्यात कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये जवळपास ८0 मधुमेह व उच्च रक्तदाबाचे रुग्ण असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

Thursday, April 9, 2020
भारतातील ४0 कोटी लोक दारिद्रय़ात जाणार
पॅरिसमधून एक बातमी आली आहे. जगातील कोरोना संसर्ग झालेल्या अनेक देशांमधील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. भारतालाही याचा मोठा फटका बसणार आहे. 'कोविड-१९'च्या प्रादुभार्वामुळे भारतावर गंभीर परिणाम होणार आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनाययझेशनने (आयएलओ)दिला आहे. कोव्हिड-१९ मुळे जगभरात या वर्षी दुसर्या तिमाहीत १९ कोटी लोकांच्या नोकर्या कमी होण्याची भीती असून, भारतात ४0 कोटी लोक दारिद्य्रात ढकलले जातील, असा इशारा आयएलओने दिला आहे.
मन करारे प्रसन्न , सर्व सिद्धीचे कारण
सध्याच्या तणावाच्या काळात मनोधैर्य टिकविण्याची गरज आहे . त्यासाठी पुन्हा संतांकडेच जावे लागते . संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे ' मन करा रे प्रसन्न , सर्वसिद्धीचे कारण हे लक्षात ठेवले पाहिजे . आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे . समाजाचे आपण जबाबदार घटक आहोत , हे लक्षात घेऊन प्रत्येकाने सध्याच्या काळात मन प्रसन्न ठेवावे . आपल्या प्रत्येक कृतीमागे अर्थ आहे . ' मस्तकस्य हस्तदय स्पर्शनम् म्हणजे दोन्ही हात जोडून छातीजवळ घ्यायचे व त्यावर मस्तक ठेवून समोरच्याला नमस्कार करायचा , असे सांगितले आहे .
Thursday, April 2, 2020
जत तालुक्यातील आरोग्य विभागाची 103 पदे रिक्त
पदे भरण्यासाठी आमदार सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात ग्रामीण रुग्णालय व आठ प्राथमिक आरोग्य केंद्रात 103 पदे रिक्त आहेत.तातडीने वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचारी या रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी जतचे आमदार विक्रम सावंत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Subscribe to:
Posts (Atom)