Saturday, November 2, 2019

राज्यभरातून २६ कोटी रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त

दिवाळीत मिठाई किंवा खवा, मावा खाल्ल्यानंतर घसा खवखवत असेल तर आश्‍चर्य वाटून घेऊ नका. यंदा दिवाळीच्या काळात मोठय़ा प्रमाणात भेसळयुक्त खवा, मावा, मिठाई, तेल, तुपासह इतर पदार्थ बाजारात दाखल झाले असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. दिवाळीच्या दिवसात राज्यभरातून जवळपास ३ कोटी रुपयांचा खवा किंवा मावा, ४ कोटी रुपयांची मिठाई, ११ कोटी रुपयांचे तेल, वनस्पती, तूप आणि ६ कोटी रुपयांचे इतर भेसळयुक्त अन्नपदार्थ प्रशासनाने जप्त केले आहेत.
राज्यातून १ हजार ९५८ किलो भेसळयुक्त खवा किंवा मावा प्रशासनाने जप्त केला असून ११६ नमुने गोळा केले आहेत. सर्वाधिक भेसळयुक्त खवा नाशिक (८७७ किलो) आणि नागपूरमध्ये (६४४ किलो) आढळला आहे. ३ हजार किलो भेसळयुक्तमिठाई प्रशासनाने ताब्यात घेतली असून यात अमरावती (१,३७६ किलो) आणि ठाणे(१,४२८ किलो) भागात अधिक प्रमाणात सापडली आहे.

व्हॉट्स अप कॉर्नर

पूजा करायच्या आधी, विश्वास ठेवायला शिका.
बोलायच्या आधी ऐकायला शिका.
खर्च करायच्या आधी कमवायला शिका,
लिहायच्या आधी विचार करायला शिका,
हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका.
आणि मरायच्या आधी जगायला शिका.
-------------------------------------------------------------------

पिकांची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी-प्रभाकर जाधव

जत,( प्रतिनिधी)-
 अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी आजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
जत तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून  पडत असलेल्या सत्ततच्या परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. परंतु सदरच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे रब्बीचा पीकांचे देखील मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झालेले आहे. द्राक्ष, डाळिंब व इतर फळबागायत पिकांचे देखील पावसामुळे मोहर गळणे, विविध प्रकारचे रोग निर्माण होणे व इतर कारणांमुळे मोठया प्रमाणात हानी झालेली आहे.

Friday, November 1, 2019

बोकडाचे मटण झाले 520 रुपये किलो


दर आणखी वाढण्याची शक्यता; कातड्याला दर नाही
जत,(प्रतिनिधी)-
बोकड्याच्या कातड्याची विक्री होत नसल्याने मटणाचा व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवसायात फायदा पडत नसल्याने बोकडाच्या मटणाच्या दरात तब्बल 40 रुपयांची वाढ केल्याने मटणाचा दर किलोला 520 रुपये झाला आहे. त्यामुळे मांसाहार करणाऱ्या खवय्यांची पंचाईत झाली असून नाईलाजाने त्यांचा ओढा बॉयलर चिकनकडे वाढला आहे. खवय्यांना दुधाची तहान ताकावर भागावण्याची वेळ आली आहे.

माडग्याळमधील वाहतूक कोंडी काही सुटेना

पोलीस चिरीमिरीत मश्गुल;ग्रामपंचायत प्रशासन सुस्त
जत,(प्रतिनिधी)-
पोलीस चिरीमिरीत गोळा करण्यात व्यस्त तर ग्रामपंचायत प्रशासन सुस्त असल्याने माडग्याळच्या आठवडी बाजारासह अन्य दिवशी जत-उमदी रस्त्यावरची वाहतूक कोंडी काही फुटेना.त्यामुळे प्रवाशांना आणि ग्रामस्थांना हकनाक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राज्यात अशा प्रकारची वाहतूक कोंडी  कुठेच होत नसल्याचे सांगितले जात आहे.

नोव्हेंबरमध्ये तब्बल 10 दिवस बँका बंद राहणार

जर तुम्हाला बँकांसंबंधी काही कामे असतील तर लवकर उरकून घ्या. या महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात एक, दोन नव्हे तर १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. या १२ दिवसात आठ सुट्टय़ा आणि चार रविवार यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या राज्यात बँका बंद राहणार असून या सुट्टय़ांचा महाराष्ट्र राज्यावर फारसा परिणाम पडणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

बदलत्या जीवनशैलीमुळे वयोमानात घट

जत,(प्रतिनिधी)-
बदललेली जीवनशैली तसेच धकाधकीच्या जीवनात मानवाचे आपल्या आरोग्याकडे लक्ष नसल्याने वयोमान घटत चालले आहे. धकाधकीचे जीवन, फास्ट फूडसह दूषित वातावरणाचा परिणाम शारीरिक कवायतींच्या अभावामुळे सद्याच्या पिढीच्या वयोमानामध्ये घट होऊन त्यांचे आयुर्मान 60 ते 65 वर्षांवर आले आहे. दोन दशकांपूर्वीची पिढी आपल्या आरोग्याबाबत जागरूक असायची. त्याचप्रमाणे सदरची पिढी र्शमदानामध्ये स्वत:ला झोकून देत असे. त्यामुळे त्या पिढीचे आयुष्यमान 80 ते 90 वर्षांपर्यंत राहत होते. त्यावेळी मिळणारा सकस आहार आज मिळत नाही. धावपळीच्या युगामध्ये दिवसरात्र पळावे लागत असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.