नारायणपूर ते उमदी प्रवास
जत तालुक्यात उमदी शहराला अनन्यसाधारण महत्त्व असुन,२५००० लोकसंख्या व तालुक्यात सगळ्यात जास्त महसुल क्षेत्र असलेल्या उमदीला अतिमहत्तवाचे व्यापारी शहर मानले जाते...उमदी (नारायणपुर) व उमदी परिसराचा आध्यात्मिक, सामाजिक , शैक्षणिक, आर्थिक,कृषी ,राजकीय अशा विविध क्षेत्रांचा अष्टांग विकास साधला जात आहे.उमदीचा ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व सुद्धा खुप मोठा आहे.कालिका मातेच्या प्रत्यक्ष पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी (मर्चंडी) उमदी होय. उमदीत पुर्वी ९ नारायण मंदीरे होते.त्यामुळे उमदीचे नांव नारायणपुर असे होते. आदिलशहांची स्वारी उमदीतुन जाताना त्यांनी याठिकाणी थांबुन पाणी पिलेे.पाणी पिल्यानंतर त्यांनी एक वाक्य उच्चारला ' क्या उमदा पानी है' (उमदा म्हणजे गोड)यावरुन तेंव्हापासुन नारायणपुर हे नांव बदलुन उमदी असे ठेवण्यात आले असा इतिहास आहे.अन्यायी व अत्याच्या-यांचे कर्दनकाळ व भक्तांच्या हाकेला धाऊन येणा-या श्री वीरमलकारसिद्धांची पुण्य भूमी ही उमदीची ओळख आहे.इंचगिरी सांप्रदायाचे जनक सद्गुरू श्री.भाऊसाहेब महाराजांचे जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून उमदीला ओळखले जाते.जीवंत देव श्री श्री श्री सिद्धेश्वर आप्पाजींचे १९९८मध्ये एक महिने वास्तव्य उमदीतच होते.उमदीच्या सीमेत आणि सीमेलागून असलेले बीजगुंती हे महालिंगरायांचे कर्मभूमी आणि सिद्धीभूमी.आणि उमदीचे बेदाणे म्हणजे सातासमुद्रापार असलेल्यांअस्सल खवय्यांसाठी अस्सल मेजवानी.अशा या पुण्यपावन भुमीबद्दलचा हा छोटासा लेखाजोखा
जत तालुक्यात दोन गावांना शहरी दर्जा देण्यात आला आहे (URBAN /Cities)१.जत२.उमदी
धार्मिक क्षेत्रे- (काही प्रमुख मंदिरे)
१.श्री वीरमलकारसिद्ध मंदिर (अन्याय व अत्याचाराचा बिमोड करणारा,सामान्यांचा रक्षण करणारा जागृत देवस्थान..१२ महीने भक्तांची मांदीयीळी,६०वर्षातुन एकदा देवास सुवर्ण लेप.२००८ साली ३ महिने सुवर्णलेप समारंभ संपन्न )
२.सद्गुरु समर्थ भाऊसाहेब महाराज पीस फाऊंडेशन मठ (भाऊरायांचा जन्मस्थळ उमदी व इंचगिरी सांप्रदायाचे जनक म्हणुन त्यांना ओळखले जाते.येथे RSS प्रमुख मोहनजी भागवत वर्षातुन किमान एकदा तरी दर्शनास येतात,बरेच साधू, संत,साधक, मंत्री ,खासदार,आमदार ध्यान व दर्शनास येतात)
३.श्री वीरभद्रेश्वर मंदिर -एक सुंदर मंदिर(याच मंदिरातील साधकांच्या सांगण्यावरुन जत येथे यल्लम्मा देवीचे मंदिर जतच्या राजेंनी बांधला)
४.श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर (समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले मंदिर)
५.माता मर्चंडी देवी (मर म्हणजे झाड आणि चंडी म्हणजे कालिका माता.स्वयं कालिका माता राक्षसांचा संहार करुन जाताना विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसले. हे शक्तीपीठ उमदी शहरापासून पश्चिमेला पाच किमीवर असलेले मर्चंडी तांडा होय.)
६.माता परमेश्वरी आंबा भवानी मंदिर
७.श्री महादेव मंदिरे २
८.जगद्ज्योती श्री बसवेश्वर मंदिर
९.अमोघसिद्ध मंदिर(निसर्गरम्य)
१०.चिनगी बाशा दर्गा(आदिल शहाचे गुरु)
११.पीर हैद्री ख्वाजा दर्गा
१२.श्री सिद्धरामेश्वर मंदिर(जन्म ठिकाण ३ कि.मी.)
१३.श्री नारायण मंदिर(उमदीत ९ नारायण मंदिरे होते याचा शिलालेख उपलब्ध आहे.याच मंदिरांमुळे पुर्वी उमदीचे नांव नारायणपुर होते असा
उल्लेख आहे.)
१४.जगद्गुरु श्री मौनेश्वर महास्वमीजी मंदिर उमदी
१५.श्री महादेव मंदिर लहान उमदी
१६.श्री मल्लिकार्जुन देवालय
१७.श्री.महलिंगराया मंदिर,बीजगुंती(महालिंगरायांचे प्रथम स्थान)
१८.श्री मरगुबाई मंदिर
१९.श्री विठ्ठल रखुमाई मंदिर (पंढरपूर रोड)
२०.श्री लक्काताई मंदिर
२१.श्री दत्त मंदिर (पोलिस स्टेशन)
अजुन बरेच मठ, मंदिरे सांगता येतील.
श्री श्री श्री सिद्धेश्वरमहास्वामीजी- या पावन पवित्र भुमीत श्री.श्री.श्री.सिद्धेश्वरआप्पाजींचे १९९९ मध्ये एक महिना अखंड प्रवचन कार्यक्रम चालला होता..या प्रवचन कार्यक्रमात परदेशी लोकांचा सुद्धा समावेश होता.)
उमदीजवळील तिर्थक्षेत्रे- १.श्रीक्षेत्र दानम्मा देवी देवस्थान(गुड्डापूर ३०किमी) २.श्रीक्षेत्र विठ्ठल रुक्मिणी देवस्थान (पंढरपूर ५५किमी) ३.श्रीक्षेत्र महात्मा बसवेश्वर (मंगळवेढा बसवेश्वरांचे मंगळवेढेत १४ वर्षे वास्तव्य,३० किमी) ४.श्रीक्षेत्र संत दामाजीपंत देवस्थान (मंगळवेढा) ५.श्रीक्षेत्र सिद्धरामेश्वर देवस्थान (सोनलगी, सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांचे जन्मस्थान, ३किमी) ६.श्रीक्षेत्र गुरूलिंगजंगम महाराज देवस्थान (देवरनिंबरगी, ८किमी) ७.श्रीक्षेत्र बलभीम देवस्थान (देवरनिंबरगी ) ८.श्रीक्षेत्र भाऊसाहेब महाराजांचे समाधी स्थळ( इंचगिरी, किमी २०) ९.श्रीक्षेत्र अल्लमप्रभू देवस्थान (बालगांव, ७किमी)
श्रीक्षेत्र अमोघसिद्ध देवस्थान ( आरकेरी ४० किमी)
उमदीतील शाळा व महाविद्यालये- १.पदव्युत्तर महाविद्यालय (MA) २.महाविद्यालय (BA ,BSc,BCom) ३.ज्युनिअर कॉलेजेस-3
४.Agricultural कॉलेज ५.मेडिकल व प्यारा मेडिकल कॉलेज ६.DEd कॉलेज ७.हायस्कुल-3 ८. English medium school-2 ९.प्राथमिक शाळा- 23
१०.शासकीय वसतीगृहे -5
उमदीतील प्रमुख शासकीय प्रकल्प
१.अहमदनगर -टेंभुर्णी- पंढरपुर-मंगळवेढा- उमदी- विजयपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561A काम प्रगतीपथावर (1600करोड)
२.पंढरपुर ते उमदी वारक-यांसाठी पालखी मार्ग ..काम प्रगती पथावर ..मंजुर निधी 256 करोड.
३.पंढरपुर उमदी विजयपुर रेल्वेमार्ग सर्व्हे होऊन 1268 कोटी रूपयेमंजुर.
४.उमदी मार्केट यार्डला मंजुरी
५.उमदी नगर परीषदेचा प्रसताव लवकरच दाखल
६.उमदी स्वतंत्र एस.टी.डेपोच्या प्रतीक्षेत.
७.वास्को टु हैद्राबाद Reliance गॅस पाईपलाईन ...उमदी येथे पंपहाऊस
शासकीय कार्यालय- १.अप्पर तहसिल कार्यालय
२.पोलिस स्टेशन( ३पोलिस अधिकारी सहीत ५०भर पोलिस कर्मचारी) ३.महिला व बालकल्याण कार्यालय (जत पूर्व भाग मुख्य कार्यलय. ) ४.टपाल कार्यालय( जत पुर्व भाग मुख्य कार्यालय) ५.सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय (जत पूर्व भाग कार्यालय) ६.सरीता मापन केंद्र ७.एस टी महामंडळ निरीक्षक कक्ष ८.मंडल अधिकारी कार्यालय
९.तलाठी कार्यालय १०.ग्रामविकास अधिकारी कार्यालय ११.MSEB १२.टेलिफोन एक्स्चेंज ऑफिस
१३.प्राथमिक आरोग्य केंद्र १४.सेतु कार्यालय
१५.ग्रामपंचायत कार्यालय
महामार्ग व रस्ते वाहतुक-
१.विजयपुर-उमदी-पंढरपुर-टेंभुर्णी-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१अ
२.तासगाव-कवठेमहांकाळ-जत-उमदी-चडचण राज्यमहामार्ग क्रमांक-१५५
३.जिल्हामार्ग -३
दळवळण- उमदी येथुन ST च्या माध्यमातुन पुणे,हैद्राबाद,हिंगोली,नांदेड,लातुर,उमरगा,अक्कलकोट,परभणी,तुळजापुर,गाणगापुर,वाशिम,बीड,उस्मानाबाद,सोलापुर ,गुलबर्गा, बीदर, भालकी, विजयपुर,बेळगांव, पंढरपुर,सांगली ,जत,मंगळवेढा,इंडी विनाथांबा डायरेक्ट प्रवास करता येतो.दिवसभरातुन ७० ते ८० एस टी बसच्या फे-या उमदीतुन होतात.जत आगाराला मिळणा-या उत्पन्नापैकी उमदी मार्गावरुन मिळणारा उत्पन्न सगळ्यात जास्त आहे.त्यामुळे उमदीला लवकरच मिनी आगार मिळणार आहे.
उमदी जवळील शहरे व उमदीचे भौगोलिक महत्त्व-
१.जत ५२ किमी (पश्चिमेस) २.पंढरपूर ५५ किमी (उत्तरेस) ३.मंगळवेढा ३०किमी(उत्तरेस)
४.सोलापूर ७० किमी (ईशान्येस) ५.चडचण ११ किमी (ईशान्येस) ६.इंडी ५० किमी (पूर्वेस) ७.विजयपूर ५५ किमी (दक्षिणेस)
BANK व पतपेढ्या- १.Bank of India(तालुक्यात सगळ्यात जास्त व्यवहार चालणारा Bank) २.DCC Bank ३.मल्टीस्टेट Bank ४.पतसंस्था -5 ५.दोन स्वतंत्र सोसायट्या ६.शिक्शक Bank -2
राष्ट्रीय आदर्श सरपंच इंदुमती लक्ष्मण माने-
स्वर्गीय पंतप्रधान श्री अटलबिहारीजी वाजपेयी यांच्या हस्ते उमदी ग्रामपंचायतचे सरपंच इंदुमती लक्ष्मण माने यांना राष्ट्रीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती लक्ष्मण माने,जत तालुका शिवसेनेचे उपाध्यक्ष शिवाजीराव पडोळकर व जत तालुका शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुधीर हुपरीकर यांच्या उपस्थितीत हे राष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय- व्यक्तिमत्त्व- साहित्य अकादमी चे मानकरी- श्री. नवनाथ गोरे सर- श्री गोरे सरांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या कामाची दखल घेत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सदस्यत्व खालील प्रमाणे-सदस्य - साहित्य व शांतिदूत संयुक्त राष्ट्र संघ (UNO) (दोन वर्षासाठी) सदस्य - महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ सदस्य - महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ
त्यांची फेसाटी हे लोकप्रिय कादंबरी खालील विद्यापीठानी अभ्यासक्रमासाठी निवडलेले आहे १.औरंगाबाद विद्यापीठ २.नांदेड विद्यापीठ ३.जळगांव विद्यापीठ ४.मुंबई विद्यापीठ ५.हैद्राबाद विद्यापीठ
सरांनी लिहिलेला सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. सरांच्या गौरवप्रित्यर्थ मध्यप्रदेश सरकारनी सरांचे नांव व फोटोसह ५ रुपयाचे स्टॅंप तिकीट काढलेला आहे.
राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,औद्योगिक क्रांतीत यशस्वीझालेले उमदीचे सुपुत्र
१.मा.कॉम्रेड कल्लापाण्णा होर्तीकर(सांगली जिल्हयातील अग्रेसर स्वातंत्र्य सेनानी )
२.मा.स्व.सिद्रामय्या हिरेमठ (वसंतदादांचे स्वीय सल्लागार)
३.मा.नामदेवराव माने(लेफ्टनंट कर्नल ,इंडियन आर्मी)
४.मा.सुनिल पोतदार (अध्यक्ष तालुका पाणी संघर्ष समिती)
५.मा.नवनाथ गोरे ( 'साहित्य आकादमी'या अतिउच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित)
६.मा.संजय नांदणीकर सर(राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित)
७.मा.मल्लिकार्जुन माने (उपजिल्हाधिकारी)
८.मा.अमृत नाटीकार (उपजिल्हाधिकारी)
९.मा.महादेव लोहार (डेप्युटी
जनरल मॅनेजर,टाटा मोटर्स पुणे)
१०.मा.आप्पासाहेब लोहार (अथर्व एंटरप्रायजेस,गौरी एंटरप्रयजेस व विशाखा एंटरप्रायजेस ,बारामती)
११.मा.महांतेश बगली (एस.पी.फॉरेस्ट डिपार्टमेंट)
१२.श्रीमती रेशमाक्का होर्तीकर (माजी अध्यक्षा ,जिल्हा परिषद ,सांगली)
१३.इंदुमती माने(राज्यातील पहिले राष्ट्रीय आदर्श ग्रामपंचायतीचे सरपंच)
१४.मा.एस.के. होर्तीकर सर(शैक्षणिक क्रांती
१५.मा.मानसिद्ध पुजारी(महाराष्ट्र कर्नाटक केसरी ढोल गायन)
१६.मा.स्व.दाजीकाका शेवाळे(लोकमान्य नेता)
१७.मा रोहन चव्हाण (उद्योजक)
१८.मा.मधुकर पोतदार(शास्त्रद्न्य 'Geologist')
१९.मा.स्व.आण्णाप्पा कंचगार (नामवंत मुर्तिकार)
उमदीची राजकीय ताकद
१.श्रीमती रेशमाक्का होर्तीकर( माजी अध्यक्षा जिल्हापरिषद सांगली)
२.मा.विक्रमसिंहदादा सावंत ( आमदार)
३.मा.चन्नापण्णा होर्तीकर(मा.जि. प.सदस्य)
४.मा.उमेशदादा सावंत( जत तालुक्याचा बुलंद आवाज व भावी आमदार)
५.मा.संजयकुमार(आण्णा) तेली
६.मा.निवृत्ती शिंदे सरकार
७.मा.शिवाजीराव पडोळकर(उपाध्यक्ष,शिवसेना जत तालुका)
८.सिद्धगोंडा लोणी
९.मा.सचिन होर्तीकर
१०.मा.निसारभाई मुल्ला
११.मा.सुरेश कुल्लोळ्ळी
१२मा.फिरोज मुल्ला
१३.शिवानंद कुल्लोळ्ळी
१४.मा.रेवाप्पाण्णा लोणी(माजी सभापती पंचायत समिती,जत)
१५.मा रमेश हळके(युवा नेता)
१६.मा.संतोष आरकेरी
१७.रविंद्र शिवपुरे
विश्वकर्मा पांचाळ समाज-एक कलेचे माहेरघर-उमदी
विश्वकर्मा पांचाळ समाज म्हणजे कलेची देवता वास करत असलेले स्थान असे म्हणतायेईल.यासमाजातील ,तरुण,प्रौढ,वृद्ध कलेचे भुकेले आहेत.उमदीत सोने,चांदी ,पितळ,तांबा,दगडी,लाकडी,माती,फायबर, प्लास्टरपासुन मुर्ती घडवणे,पालख्या तयारकरण्याचे कलाकुसरीचे काम कंचगार ,सुतार,पोतदार, तांबट,लोहार कुटुंबीय अहोरात्र करतात.येथे तयार केलेले मुर्ती चेन्नई,हैद्राबाद ,बेंगलुर,मुंबई,पुणेतसेच परदेशातसुदधा पहावयास मिळतात.
मुर्ती भांडार- १.विश्वकर्मा मुर्ती भांडार २.काळिका मुर्ती भांडार ३.मौनेश्वर मुर्ती भांडार ४.लक्श्मण मुर्ती भांडार
५.प्रकाश फर्निचर वर्क्स(पालखी तयार) देवभूमी
विश्वकर्म-पांचाळ समाजामुळे उमदीला देवभूमी म्हणून ओळखले जाते कारण हजारो गावातील वेगवेगळ्या प्रकारच्या देवीदेवतांचे मुर्ती व हजारो गावातील मोहरमचे पंजे उमदीतच तयार होत असल्याने उमदीला देवभूमी, देवीदेवतांचे माहेरघर तथा देवांचीजन्मभूमी म्हणून ही ओळखले जाते. विश्वकर्म-पांचाळ समाज हे उमदीच्या विकासातील व प्रसिद्धीतील महत्त्वाचे केंद्रबिंदू आणि मुकूटमणि म्हणून ओळखले जाते.
उमदीत वैद्यकीय सेवा पुरविणारे डॉक्टर्स १डॉ.दस्तगीर मिरजकर(MBBS) २.डॉ.मल्लाप्पा माळी(MBBS) ३.डॉ.योगेश बार्शिकर (MD) ४.डॉ.मल्लिकार्जुन म्हेत्रे(MD) ५.डॉ.सौ.अश्विनी म्हेत्रे (MS) ६.डॉ.गजानंद गुरव(MS) ७.डॉ.राजेंद्र झारी (MS) ८.डॉ रविंद्र हत्तळ्ळी(BHMS) ९.डॉ.राहुल पाटील(BAMS) १०.डॉ.सौ.स्नेहा पाटील(BAMS) ११.डॉ शिरीष हिरेमठ(BAMS) १२.डॉ.सौ.हिरेमठ(BAMS) १३.डॉ राजकुमार भद्रगोंड(BHMS) १४.डॉ.साधीक मिरजकर(BDS) १५.डॉ लक्काप्पा लोणी(BAMS
१६.डॉ.सौ.लोणी(BAMS) १७.डॉ.अक्षय चव्हाण (BDS) १८.डॉ.क्रांतीवीर बिराजदार(BAMS)
१९.डॉ.सौ बिराजदार(BAMS) २०.डॉ.केदारनाथ पावटे मेडीकल्स१४
कृषी विषयक-जत पुर्वभाग आवर्षण ग्रस्त असुन सुद्धा उमदीचा शेतीमधला विकास वाखाणण्याजोगा आहे.येथे पिकवला जाणारा द्राक्श व बेदाण्याला आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत सर्वात जास्त मागणी आहे.प्रत्येक वर्षी इथला बेदाणा सगळ्यात जास्त भावाने विकला जातो.आजपर्यंतच्या सौद्यात ३८१रुपये (शेतकरी-श्री रमेश कराळे) इतके सर्वोत्तम भाव सुद्धा उमदी करांच्या बेदाण्यालाच मिळाला आहे.म्हणुन उमदी ब्र्यांड बेदाण्याला व्यापा-याकडुन खुप मोठी मागणी असते.उमदी परीसरात जवळजवळ ३०००(3 हजार) एकरावर द्राक्श शेती केली जाते.शेतक-याच्या दिमतीला व मदतीला २०भर कृषी केंद्रे आहेत.
खेळ-राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू-
उमदी सारख्या ग्रामीण भागातुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश खेचुन उमदीचे नाव. सातासमुद्रापलीकडे आंतरराष्ट्रीय खेळात अव्वल स्थानी नोंदवले गेले आहे.त्यासाठी खेळाडुंचे कठोर परीश्रम व जिद्द आणि चिकाटी यामुळे अनेक खेळाडू घडले आणि घडविले गेले.स्वत:च्या अपंगत्वावर मात करत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारे संजय नांदणीकरसरांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले(कोच वेटलिफटिंग)व नितीन तोरणे सर(राष्ट्रीय पंच व कोच बेसबॉल व सॉफ्टबॉल)यांच्या कठोर प्रशिक्षणातुन अनेक खेळाडुंनी देशाला व राज्याला सुवर्ण,रौप्य,कांश्य पदक मिळवुन दिले.
आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धा
१.कु.मोहीनी चव्हाण-Gold एशियन गेम्स
२.कु रुपा हनगंडी- Silver 2 व Bronz
राष्ट्रीय खेळाडु वेटलिफ्टिंग- १.चंद्रकांत सुतार-Gold 3
२.यशवंत पडवळे-Gold ३.बंटी गायकवाड-Gold
४.सविता कसबे- Gold ५.मालन तांबोळी- Gold
६.निलम कांबळे- Gold ७.आशाराणी इम्मनवरु-Gold सॉफ्टबॉल व बेसबॉल राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्य
व्यापारी केंद्रे व इतर- १.3पेट्रोल पंप + दोन प्रस्तावित
२.तीन टु व्हीलर शोरुम(1Hero, 2 Honda, 3Bajaj)
३.दोन ट्रॅक्टर शोरूम ४.पाच हार्डवेअर दुकान
५.फर्निचर शोरुम्स ६.२० कृषी केंद्रे ७.तीसएक किराणा दुकान ८.होलसेल किराणा व भुसार ९.MRF tyre showroom १०.ज्वेलरी शोरुम्स ११.१४ मेडिकल्स
१२.सि-यामिक सेंटर १३.संगणक केंद्रे
१४.पुस्तकालय-3 १५.स्टेशनरी व कटलरी-8
१६.गिफ्ट सेंटर्स १७.सुसज्ज फोटो ग्राफी सेंटर्स
१८.मोबाईल शोरुम्स१९.होलसेल भांडी दुकाने
२०.इलेक्ट्रीक दुकाने २१.इलेक्ट्रॉनिक दुकाने
२२.टी व्ही व इलेक्ट्रॉनिक शोरुम२३.HP Gas Agencies
मा.खा.संजयकाका पाटील यांचा- उमदीच्या विकासात सिंहाचा वाटा १.विजयपुर-उमदी-मंगळवेढा-पंढरपुर-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग ५६१ अ मंजुरी मिळवून देत काम प्रगतीपथावर आहे.
२.उमदी अप्पर तहसिल मंजुरीत सिंहाचा वाटा.
३.विजापुर-उमदी-पंढरपुर रेल्वेचा सर्व्हे करवुन घेवुन मंजुरी मिळवुन देण्याच्या अंतिम टप्प्यात.
४.४२गावांचा पाणी संघर्षसमितीच्या माध्यमातुन पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश.
५.लवकरच दोड्डनाला मध्यम प्रकल्प म्हैसाळ योजनेने भरण्याच्या तयारीत.
मान्यवरांचे उमदीला भेट-मा.मोहनजी भागवत(RSS प्रमुख)
मा.महेंद्रसिंग टिकाईत (केंद्रीय मंत्री)
मा. स्वातंत्र्य सेनानी मा.नागनाथअण्णा नायकवडी
मा. लोकनेते राजारामबापू पाटील मा.वसंतदादा पाटील(मुख्यमंत्री) मा.रामकृष्ण हेगडे(मुख्यमंत्री कर्नाटक) मा.प्रकाश जावडेकर (केंद्रीय मंत्री)
मा.नारायण राणे(मुख्यमंत्री) मा.B.S यडीयुराप्पा(मुख्यमंत्री कर्नाटक) मा.गोपीनाथजी मुंडे (उप मुख्यमंत्री) मा.सुप्रियाताई सुळे मा.अजित दादा पवार(उप मुख्यमंत्री) मा. रामदास आठवले (केंद्रीय मंत्री) मा.आर आर पाटील (उप मुख्यमंत्री) मा.जयंतराव पाटील (अर्थमंत्री) मा.पृथ्वीराज चव्हाण(मुख्यमंत्री) मा.चंद्रकांतदादा पाटील(महसुल मंत्री) मा. प्रतिक पाटील (केंद्रीय कोळसा मंत्री)
विश्वजीत कदम(राज्य मंत्री) मा.सुभाष देशमुख(पालक मंत्री) मा.पतंगराव कदम(शिक्शणमंत्री)
मा. विलासराव जगताप मा सदाभाऊ खोत (कृषी)
मा. चित्रा वाघ (प्रवक्त्या भाजप) मा. प्रविण दरेकर(प्रवक्ता भाजप) मा लक्ष्मण सवदी (मा.उपमुख्यमंत्री कर्नाटक) मा. गोविंद कार्जोळ( मंत्री कर्नाटक) मा. शोभा कार्जोळ (मंत्री कर्नाटक) मा. एम. बी. पाटील (मा.जलसंपदा, गृह मंत्री)
मा. आण्णा डांगे मा राजु शेट्टी मा. सुनिल तटकरे मा पैलवान गामा मा.पैलवान दाराशिंग आणि अजुन बरेच...
संविधानाचे चौथे स्तंभ
उमदीतील आजी-माजी पत्रकारबंधू मा. सुनील पोतदार (दै.तरूण भारत) ,मा. मनोहर कोकळे-पवार(TV1 मराठीचे संपादक, दै. केसरी) मा.सुभाष कोकळे (TV6 मराठीचे संपादक, दै. पुण्यनगरी) ,मा. प्रशांत कोळी (उपसंपादक दै लोकमत सातारा जिल्हा) ,मा. मलकारी वायचळ(दै.पुढारी) मा. महेश चव्हाण (लोकमत) ,मा. राहुल संकपाळ (दै.लोकमत) ,मा. महादेव कांबळे (दै.तरूण भारत) मा. सचिन होर्तीकर(दै. लोकमत) ,मा. प्रमोद पैठणकरसर( दै. विजयवाणी कन्नड) ,मा. नारायण भोसले(दै.जन प्रवास) ,मा. यलप्पा कावडे(दै.सकाळ) मा. सतीश माने(दै.सकाळ)
लेखन- रमेश महादेव सुतार
No comments:
Post a Comment