सांगली,(जत न्यूज नेटवर्क)-
सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील लेखिका मेघा पाटील यांच्या 'विस्कटलेली चौकट' या मराठी कादंबरीला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील दोस्ती फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा लक्षवेधी कादंबरी लेखन पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रीरामपूर येथे 4 डिसेंबर रोजी पुरस्कार वितरण होणार आहे.
लोककलावंत मजनुभाई शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारासाठी मेघा रमेश पाटील यांच्या 'विस्कटलेली चौकट' या कादंबरीस 'लक्षवेधी कादंबरी लेखन' पुरस्कार जाहीर झाला आहे. 4 डिसेंबर रोजी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पुरस्कार वितरण होणार आहे.
मेघा पाटील यांनी आतापर्यंत 'पुढचं पाऊल' (काव्यसंग्रह) , 'आलकीचं लगीन' (कथासंग्रह) तसेच 'उंबरठ्यावरचा नाल', 'विस्कटलेली चौकट', 'शेतकरी नवरा', 'सुलवान' या चार कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांना साहित्य कलायात्री प्रकाशनकडून कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार, युगंधर काव्यभूषण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. तसेच गारगोटी, अमरावती, पंढरपूर, नागपूर, जामखेड, अहमदनगर, पुणे, सटाणा, औरंगाबाद येथील विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच विविध काव्य स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून बक्षिसे मिळवली आहेत. शेटफळे (आटपाडी) येथील कविसंमेलनात अध्यक्षस्थान भूषवले आहे. विविध कविसंमेलनात काव्य वाचन केले आहे.
No comments:
Post a Comment