जत,(प्रतिनिधी)-
भारत हा जैवविविधतेने समृद्ध देश असून अनेक दुर्मिळ वनौषधींचा खजाना आहे. या दुर्मिळ औषधी वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी युवा पिढीने प्रामाणिक प्रयत्न करावा असे प्रतिपादन डाॅ. विनोद शिंपले यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वनस्पतीशास्त्र विभाग, सायन्स असोसिएशन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत "औषधी वनस्पती: ओळख व संवर्धन" या एक दिवसीय कार्यशाळेत 'पश्चिम घाटातील औषधी वनसंपदा' या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे होते.
Friday, February 28, 2020
वाचण्यातून, बोलण्यातून भाषा समृद्ध होते : लवकुमार मुळे
जत,(प्रतिनिधी)-
आपल्या सभोवताली जे घडते, आपण जे पहातो, अनुभवतो आणि आपण जे वाचन करतो त्यातून आपले व्यक्तीमत्व तर घडतेच, पण त्यातून आपली भाषा समृद्ध होण्यासाठीही मदत होते. त्यासाठी सर्वांनी वाचन, मनन, निरीक्षण आणि जाणीवपूर्वक मराठीचा वापर केला पाहिजे, असे मत कवी लवकुमार मुळे यांनी मराठी साहित्य सेवा मंच, शेगांव व कविवर्य नारायण सुर्वे कवी मंच, रड्डे यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शेगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

Wednesday, February 26, 2020
शाळेत मराठीची सक्ती योग्य, भाषा विकासासाठी हवे प्राधिकरण
मराठीच्या संवर्धनासाठी व्यापक उपाययोजनांची गरज : मराठीतील विविध बोलीभाषांचेही व्हावे जतन
जत,(प्रतिनिधी)-
मराठी ही आपली मातृभाषा. अमृतातेही पैजा जिंके, असे मराठीचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केले आहे. मात्र, आज मराठीची अवस्था काय आहे? मराठीला वैभवाचे दिवस आणण्यात आपण सर्व तिची लेकरे कमी पडत आहोत. शासकीय कामकाजात मराठी भाषा असली तरी ती घरातून मात्र हद्दपार होत आहे. आता शासनाने अभ्यासक्रमात मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे मराठीच्या संवर्धनाला हातभार लागेल. पण केवळ एवढय़ावर भागणार नाही तर मराठीसाठी स्वतंत्र प्राधिकारणही हवे, अशी मागणी केली जात आहे.

Tuesday, February 25, 2020
भोंदू बाबाने केले पाच बहिणींवर अत्याचार
पुत्रप्राप्ती आणि घरात असलेले गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीमध्ये २२ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत हा संतापजनक प्रकार घडला आहे. पिंपरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत या भोंदूच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' पुस्तकाचे प्रकाशन
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' बालकथा संग्रहाचे प्रकाशन कुपवाड (सांगली) येथे पार पडलेल्या सहाव्या जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनात 'किशोर' मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्याहस्ते पार पडले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सांगली), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने सहावे विद्यार्थी साहित्य संमेलन कुपवाड (सांगली) नवकृष्णा व्हॅली येथे पार पडले. यावेळी लेखक,शिक्षक आणि पत्रकार असलेल्या मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' या बालकथा संग्रहाचे प्रकाशन झाले.

Monday, February 24, 2020
वर्षात 42 हजार लोकांना सर्पदंश
महाराष्ट्रात सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. २0१८-२0१९मध्ये महाराष्ट्रात ४२ हजार २६ जणांना सर्पदंश झाला असून त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये ३६ हजार ८५८ घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात नाशिकमध्ये सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडल्या असल्याचेही एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Sunday, February 23, 2020
संत निरंकारीमार्फत ग्रामीण रुग्णालयांची साफसफाई
जत,(प्रतिनिधी)-
स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँम्बेसेडर असलेल्या संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशनच्यावतीने संत निरंकारी मंडळाचे तत्कालीन सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या ६६ व्या जयंतीनिमित्त संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन (दिल्ली) शाखा जत सेवादल युनिट क्रमांक ११६१ यांनी ग्रामीण रुग्णालय जत येथे स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविले. देशभरामध्ये एकुण १३२० हाँस्पिटलची स्वच्छता करण्यात आली. जत रुग्णालयाच्या आतील भागाची व बाहेरील संपुर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर जत येथील एस. आर. व्ही. एम. हायस्कुल येथेही स्वच्छता करण्यात आली. यामध्ये सुमारे २०० निरंकारी भाविक भक्त सेवादल महापुरुषांनी सहभाग घेतला.
Subscribe to:
Posts (Atom)