परवीन बाबी हे नाव समोर उच्चारले की आपल्यासमोर येतो तिचा ग्लॅमरस अंदाज. बॉलिवूडची दिवा असं तिला म्हटलं जायचं. तिचं 'जवानी जानेमन हे गाणं' असो किंवा 'प्यार करनेवाले प्यार करते हैं शान से' हे गाणं असो किंवा अगदी खुद्दार सिनेमातलं 'मच गया शोर सारी नगरी रे' असो आजही तिची गाणी लोकांच्या लक्षात आहेत. मनावर रुंजी घालत आहेत. मात्र या परवीन बाबीचा मृत्यू झाला ते तीन दिवसांनी समजलं होतं. तिला जाऊन १५ वर्षे झाली आहेत. मात्र तिच्या अनेक चित्रपटांमुळे आणि एकाहून एक सरस गाण्यांमुळे ती आजही सिनेरसिकांच्या स्मरणात आहे आणि यापुढेही राहिल.
Friday, January 24, 2020
...आणि लग्नात नीतू आणि ऋषी पडले बेशुद्ध
बॉलिवूडमधील 'ऑल टाईम हीट' जोडी म्हणजे अभिनेता ऋषी कपूर आणि नितू कपूर. 'जहरीला इन्सान' या चित्रपटाच्या सेटवर ओळख झालेल्या या जोडीच्या लग्नाला आता जवळपास ४0 वर्ष झाली आहे. मात्र त्यांचं एकमेकांप्रतीचं प्रेम, आदर यत्किंचितही कमी झालेला नाही. 'जहरीला इन्सान' या चित्रपटाच्याच वेळी या दोघांमधलं प्रेम खुललं आणि १९८0 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. परंतु ऐन लग्नात नितू आणि ऋषी कपूर बेशुद्ध पडले होते. या मागचं कारण नितू कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
वसंत पंचमीचे महत्त्व
वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. भारतात साधारणत: मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणार्या संस्थांमध्ये, विद्येची देवता-सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो.
Thursday, January 23, 2020
आचार्य चाणक्य देतात सुखी जीवनाचा मंत्र
आचार्य चाणक्य एक महान नीतिकार होते. त्यांनी सुखी आणि श्रेष्ठ जीवनासाठी विविध नीती सांगितल्या आहेत. आजच्या काळातही या नीतींचे पालन केल्यास व्यक्ती अडचणींपासून दूर राहू शकतो. चाणक्याच्या या दोह्यामधून समजू शकते की, व्यक्तीने कोणत्या गोष्टींमध्ये संतुष्ट राहावे आणि कोणत्या गोष्टींमध्ये संतुष्ट राहू नये.
Wednesday, January 22, 2020
भारतातील 231 शहरे सर्वात प्रदूषित
भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे सर्वात प्रदूषित असल्याचे ग्रीनपीसच्या अहवालात म्हटले आहे. झारखंडमधील कोळसा खाणींचा उद्योग असलेले झारिया हे देशातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे स्पष्ट झाले असून दिल्लीचा क्रमांक दहावा लागला आहे.
कसे फेडायचे कर्ज?
गृहकर्ज, वाहनकर्ज आणि क्रेडिट कार्ड या
सगळ्यांचे हप्ते एकाच वेळी चुकविण्याची वेळ अनेकांवर येते. अशा वेळी आर्थिक नियोजन
पूर्णपणे कोलमडतं. खर्चाचा ताळमेळ बसवता बसवता नाकी नऊ येतात. हप्ते वेळेत न
भरल्यास सबल स्कोअरही खराब होतो. अशा परिस्थितीत अर्थनियोजन कसे करावे, यासाठीच्या काही टिप्स..
कर्जफेडीचे नियोजन कसे असावे हे तपासण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया.
मासिक उत्पन्न ७५,000 रुपये असलेल्या व्यक्तीचा मासिक खर्च ४0
हजार रुपये आहे. उर्वरित ३५ हजार रुपयांमध्ये या व्यक्तीला गृहकर्ज,
वाहनकर्ज आणि क्रेडिट कार्डचे हप्ते भरावे लागतात. या व्यक्तीकडे २७
लाख ९३ हजार रुपयांची संपत्ती आहे.
या आहेत भारतातील प्रभावशाली महिला
भारतीय महिला या जगभरात नेहमीच त्यांचे शांत, संयमी वागणे, लांब केस, साडी, दागिने, घरात आपल्या कुटुंबाची काळजी वाहणार्या म्हणून ओळखल्या जातात. परंतु प्रत्येक पिढी दरपिढी काही महिला नेहमीची परंपरा मोडीत काढून स्वत:ला सशक्त, स्वतंत्र आणि विविध रुपात वावरताना दिसतात. झाशीची राणी लक्ष्मीबाईने रणात लढताना आपले प्राण अर्पण केले. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, मानवतेचे प्रतीक मदर तेरेसा ही त्यातलीच काही उदाहरणे आहेत. अशाच काही प्रभावशाली महिलांची ही ओळख..
Subscribe to:
Posts (Atom)





