Tuesday, December 17, 2019

फेसबुकवरील मित्रांना भेटायला गेली अन घरदार विसरली

सोशल मीडियाचा महत्त्वाचा हिस्सा म्हणून फेसबुककडे पाहिले जाते. ज्याद्वारे जुन्या मित्रांना शोधले जाते आणि नवीन मित्रही बनविले जातात. लहानापासून ते अगदी मोठय़ांची फेसबुक ही दिवसाची आवश्यकता झाली आहे. अशाच फेसबुकवर बनविलेल्या मित्रांना भेटण्याकरिता नवरा आणि चार वर्षाच्या मुलाला सोडून गेलेल्या बायकोला शोधून काढण्यात पोलिसांना चांगलाच कस लागला खरा, पण त्यामागील सत्य शोधले. तर, सोशल मीडियाचा वापर किती नुकसानकारक ठरू शकते, याचा विचार न केलेलाच बरा. घटना आहे वर्धा शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या बोरगाव (मेघे) येथील. तब्बल २४ दिवस मित्रांची भेट घेतलेल्या बायकोला नवर्‍याच्या स्वाधीन करण्यात वर्धा पोलिसांना यश आले.

Monday, December 16, 2019

जेलमधून फरार आरोपीस जत येथे पोलिसांनी पकडले

जत,(प्रतिनिधी)-
जेलमध्ये घेऊन जाताना 30 नोव्हेंबर रोजी फरार झालेल्या गणेश ऊर्फ पप्पू दत्तात्रय गस्ते (रा. वाढेगाव, ता. सांगोला) या आरोपीस गोपनीय खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटेच्या सुमारास वाळेखिंडी (ता. जत, जि. सांगली) येथे सांगोला पोलिसांनी शिताफीने पकडले, अशी माहिती पो.नि. राजेश गवळी यांनी दिली. गेले 15 दिवस सदर आरोपी सतत जागा बदलत होता.सांगोला तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरून आरोपी गस्ते याने पोलिसाच्या हातास हिसका मारून अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले होते.

बोरे काढायला गेलेल्या दोन मुलांचा नदीत पडून मृत्यू


जत ,(प्रतिनिधी)-
शाळेला न जाता बोरे काढून पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जत तालुक्यातील सिंगनहळळी येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. श्याम शिवाजी हिप्परकर (वय 10) व अतुल पोपट हिप्परकर (वय 9) अशी मयत मुलांची नावे आहेत.

Sunday, December 15, 2019

विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे कायमच!

जत,(प्रतिनिधी)
दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्या आणि दप्तराच्या ओझ्याने विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास सुरू झाला आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये शिकत असलेल्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढत असल्याचे दिसून येत आहे. याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात मणक्याच्या आजाराला बळी तर पडावे लागणार नाही ना? अशी भीती व्यक्त होत आहे. पाठय़ पुस्तका व्यतिरिक्त अन्य शैक्षणिक साहित्यांच्या भारामुळे दप्तराचे ओझे वाढत असल्याचे दिसत आहे.

Friday, December 13, 2019

बॉलीवूड आणि 2019

बॉलिवूडसाठी २0१९ हे वर्ष फार विशेष होतं. या वर्षी अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. काही सिनेमांनी चांगली कमाई केली तर ज्या सिनेमांकडून अपेक्षा होत्या त्यातील काही बॉक्स ऑफिसवर दणदणीत आपटले. दरम्यान, गूगल इंडियाने १0 सिनेमांची यादी शेअर केली आहे. यात सर्वाधिक सर्च केले गेलेले सिनेमे कोणते ते सांगितले आहेत. कबीर सिंग- या यादीत पहिलं नाव आहे ते शाहिद कपूरच्या कबीर सिंग सिनेमाचं. तेलुगू सिनेमा अर्जुन रेड्डीचा हा अधिकृत रिमेक होता. सिनेमाचं संगीत, संवाद याने तरुणाईला अक्षरश: वेड लावलं. असं असलं तरी अनेकांनी या सिनेमाचा विरोधही केला. कबीर सिंग शाहिदच्या करिअरमधला सर्वात हिट सिनेमा ठरला.

Thursday, December 12, 2019

ऐतिहासिक मिरज आणि कराड प्रांत

इतिहास इ. स. १००० ते इ. स. १८००
सांगलीचा इतिहास इ. स. १००० ते इ. स. १८००
१०२४ गोंक या शिलाहार राजाच्या ताब्यात ' मिरिच' (मिरज) व ' करहाटक'  (कराड) व दक्षिण कोंकण हा प्रांत होता. यातच सांगलीचा भूभाग समाविष्ट होता.
१२०५ शिलाहार राजा गंगादित्य याने मिरज भागांत इसकुडी येथे तलाव बांधला.  कोल्हापूर, मिरज, शेडबाळ व तेरदाळ येथे याबाबतचे शिलालेख आहेत.
१२५० - १३१८
देवगिरीच्या यादव राजानी या भागावर राज्य केले त्यावेळी ' मिरिच' प्रांतात तीन हजार गांवे होती.
१३१९ - १३४७
दिल्लीच्या खिलजी व तुघलकानी या भागावर राज्य केले.
१३४८ - १४८९
बहामनी सुलतानानी या भागावर राज्य केले.
१४९० - १६५९

जत जवळील किल्ला:रामदुर्ग

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अनेक गड , किल्ले, गढ्या बांधलेल्या आहेत. त्यातील काही छोटे किल्ले आणि गढ्या स्थानिक मातब्बर सरदारानी बांधलेल्या आहेत. स्वसंरक्षणा बरोबर प्रशासकीय कारभारासाठी छोटे किल्ले बांधले जात. अशाच प्रकारचा एक छोटेखानी गढी वजा किल्ला "रामदुर्ग" विजापूरचे सरदार डफळे यानी सतराव्या शतकात सांगली जिल्ह्यातील रामपुर या गावातील छोट्याश्या टेकडीवर बांधला. किल्ल्याचा आकार, संरक्षणाच्या सोई आणि पाण्याची व्यवस्था पाहाता हा किल्ला प्रशासकीय व्यवस्थेसाठी बांधला असावा असे म्हणता येइल.