जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्रातील 5 हजारांवर गावांमध्ये अद्याप मोबाईल सेवा पोहोचली नसल्याची धक्कादायक माहिती दूरसंचार विभागानेच केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. कोकणातील दुर्गम भाग आणि नक्षलग्रस्त भागातील गावांचा यामध्ये समावेश आहे.
Saturday, May 11, 2019
जलसंधारणाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील दुष्काळी भागाला नवसंजीवनी देण्यासाठी जलसंधारणाची कामे सुरू आहेत. सदरची कामे निकृष्ठ पध्दतीने सुरू असून या कामाची गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी केली आहे.

शासनाने दुष्काळग्रस्त लोकांना तातडीने मदत करावी:प्रकाश जमदाडे
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात १९७२ पेक्षाही भयावह दुष्काळ पडला असून नागरिक हवालदिल झाले आहेत. हाताला काम नाही, प्यायला पाणी नाही तर जनावरांना चारा नाही अशी अवस्था येथे निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत करावी अशी मागणी माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन पाठवून केली आहे.

Friday, May 10, 2019
चारा छावण्या ग्रामपंचायतींना चालवायला द्या: बसवराज पाटील
जत,(प्रतिनिधी)-
सध्या जत तालुक्यात 1972 सालच्या दुष्काळापेक्षा भयंकर दुष्काळ पडला असून पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पशुधन धोक्यात आले आहे. शासनाने चारा छावण्या संस्थांना चालवायला देण्यापेक्षा ग्रामपंचायतींना चालवायला द्याव्यात अशी मागणी एकुंडीचे सरपंच तथा सरपंच परिषद जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली आहे.

आठ वाहन चालकांवर ई-चलनाद्वारे कारवाई
जत,(प्रतिनिधी)-
नियम मोडणाऱ्या वाहनधारकांविरोधात कारवाई करण्यासाठी ई – चलन प्रणाली अस्तित्वात आली असून जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशानुसार उमदी पोलीस ठाण्याअंतर्गत मोहीम राबविण्यात आली. यामध्ये एकूण सात वाहनावर ई – चलनाद्वारे दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. तसेच दारू पिऊन वाहन चालवीत असणाऱ्या एकावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी दिली.

दुष्काळ योजना न राबविल्यास 14 रोजी रास्ता रोको
जत,(प्रतिनिधी)-
डफळापूर आणि परिसरात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. डफळापूरला पाच रुपयाला एक घागर पाण्याची घागर मिळत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा टँकर व चारा छावण्या सुरु करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा 14 मे रोजी डफळापूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड हणमंत दत्तात्रय कोळी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

सातव्या वेतनानुसार पगार लवकरच:शिक्षणाधिकारी सौ. वाघमोडे
जत,(प्रतिनिधी)-
सातव्या वेतनानुसार तालुका स्तरावरून बिले आल्यास तातडीने पगार दिला जाईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास सांगली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. निशादेवी वाघमोडे- बंडगर यांनी दिली. या शिवाय अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

Subscribe to:
Posts (Atom)