जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील डफळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा क्र.2 येथे 'संगीत कस्तुरी 2019' या नावाने स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. पालक आणि गावकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी क्रमिक अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. भविष्यातील कलाकाराचा पाया इथेच घातला जातो, असे म्हटल्यास वावगे होणार नाही आणि म्हणूनच शाळा, शिक्षक, पालक यांच्याप्रमाणे विद्यार्थीदेखील स्नेहसंमेलनाची आतुरतेने वाट पाहत असतात. मुलांसाठी स्नेहसंमेलन खूप महत्त्वाचे असते.
Sunday, January 20, 2019
Saturday, January 19, 2019
नवीन वर्षाचा पहिला ‘सुपरमून’ २१ रोजी
जत,(प्रतिनिधी)-
चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असतो. त्यामुळे तो महिन्यातून एकदा पृथ्वीच्या जवळ येतो व एकदा दर ही जातो. मात्र, ज्यावेळी चंद्र पृथ्वीपासून वाजवीपेक्षा कमी अंतरावर येतो. त्यावेळेस चंद्राचे बिंब नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा मोठे दिसते. अशा चंद्राला ‘सुपरमून’ असे म्हगतात. दि. 21 जानेवारी रोजी या वर्षीची पहिल्या सुपरमूनचा योग आहे.

सायकल दुकानदाराचा महिलेने केला गळा आवळून खून
जत,(प्रतिनिधी)-
कोंतेबोबलाद (ता. जत) येथे शुक्रवारी शहानूर खाजासाब मकानदार (वय 25) याचा याचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. त्याचा अनैतिक संबंध ठेवण्याच्या कारणावरून खून झाला असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी एका संशयित महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.अनैतिक संबंधासाठी वारंवार त्रास देत असल्याने आपण शहानूरचा गळा आवळून खून केल्याचे संशयित महिलेने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

संखला दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करा: सुशीला होनमोरे
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या पूर्व भागातील लोकांच्या सोयीसाठी संख येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे, मात्र या ठिकाणी विविध किरकोळ दाखले सोडले तर काहीच उपलब्ध होत नाही. उलट लोकांचा त्रास वाढला असून दाखल्यांच्या पूर्ततेसाठी जतला मग पुन्हा संख असा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे लोकांची सोय होण्याऐवजी मोठी गैरसोय होत आहे. संखला दुय्यम निबंधक कार्यालय सुरू केल्यास बहुतांश सोयी ची पूर्तता होणार आहे. त्यामुळे संखला दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुशीला होनमोरे यांनी महसूल मंत्र्यांकडे केली आहे.

जत-देवनाळ रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट
![]() |
| (जत-देवनाळ रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असताना पाठीमागे अशी खडी उचकटली जात आहे.) |
जत ते देवनाळ रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. डांबराचा अजिबात वापर करण्यात न आल्याने अंथरलेली खडी पुन्हा उखडू लागली आहे. या कामाची चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
Friday, January 18, 2019
मोहनराव,विश्वजीत कदम लोकसभेसाठी इच्छूक नाहीत
काँग्रेसमध्ये उमेदवारीबाबत गोंधळ
जत,(प्रतिनिधी)-
खासदार संजय पाटील यांच्या विरोधात उमेदवार उभे करण्याबाबत काँग्रेस गोंधळलेली असल्याचे स्पष्ट दिसत असून कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कालच झालेल्या काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत याचे पडसाद दिसून आले. या बैठकीत आमदार मोहनराव कदम आणि विश्वजीत कदम लोकसभेसाठी इच्छूक नसल्याचे स्पष्ट झाले.

(संपादकीय) मोबाईलवर स्मार्टशिक्षण द्या
ओडिसातील गंजम जिल्ह्यामध्ये ओडिया माध्यमांच्या
शाळांमध्ये स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन अध्यापन प्रणाली यासाठी विकसित केली असून यथावकाश
अशा प्रकारचे शिक्षण संपूर्ण राज्यात दिले जाणार आहे. स्मार्टफोनच्या
माध्यमातून शिक्षण देण्याची ही कल्पना मोठी भन्नाट असून याचा लाभ नक्कीच विद्यार्थ्यांना
होणार आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ शिक्षकांनी घेतलेल्या शिकवणीचे
रेकॉर्डिंग करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. यूट्युब
आणि व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून शिक्षकांचे अध्यापन उपलब्ध करून
दिले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार
आहे. एखाद्या दिवशी विद्यार्थी अनुपस्थित राहिला तरी त्याला स्मार्टफोनच्या
माध्यमातून मागे काय शिकवले, याची माहिती मिळू शकते.या स्मार्टफोन शिक्षणाचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. खरे तर आपल्या महाराष्ट्र सरकारने याबाबतीत आघाडी घ्यायला हवी होती.
पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र हे शब्द फक्त नावालाच आहेत, असेच शिक्षणाच्याबाबतीत जाणवते.
Subscribe to:
Posts (Atom)