Thursday, October 14, 2021

कडेगावची डोंगराई देवी


कडेगाव शहराच्या दक्षिणेला कडेपूरच्या डोंगरावर डोंगराईदेवीचे प्राचीन मंदिर आहे. गिरीकंदरातील अतिप्राचीन असे हे शक्तीपीठ आहे. मध्ययुगात इ. स. १२०९ मध्ये राजा भोज यांचा देवगिरीचा सम्राट सिंधण यादव यांनी पराभव करून दक्षिण सातारा (पूर्वी सांगली, सातारा जिल्ह्यांत होती) कोल्हापूर भागावर सत्ता प्रस्थापित केली. त्यांच्या पदरी असलेल्या हेमाद्रिपंताने महाबळेश्वर येथे बरीच हेमाद्रिपंताकडून महाबळेश्वराच्या पूर्वेस १६० कि.मी. कडसूर पर्वत पूर्वीचा लिंगराज पर्वत या डोंगरावर म्हणजेच आताचे श्री क्षेत्र “डोंगराई" या ठिकाणी मंदिर उभारल्याचे मानले जाते. शिर्के व जावळीच्या मोरे घराण्याची सत्ता आल्यावर अनेक सरदार व कडेपूरच्या यादव-देशमुख घराण्यांनी देवीच्या मंदिराची वेळोवेळी डागडुजी केली. त्यांनी कडेपूरचे लढाऊ यादव-देशमुख व परिसरातील शेकडो भक्त हाताशी धरून, तटबंधी गड बांधला. उत्तर दिशेला औंधच्या देवीकडे तोंड करून चिरेबंदी मोठा दरवाजा बांधला. गडावर पायऱ्या केल्या. या डोंगराई गडावरून चारी दिशांची स्पष्ट टेहळणी केंद्र म्हणून निवड करून, तोफखाना व्यवस्था केली. बारा वर्षे तीर्थथान करून इ. स. १६४५ साली, श्री समर्थ रामदास स्वामी चाफळहून उंब्रजमार्गे प्रथम काडासूर तर आताचे नाव कडेपूर या परिसरमध्ये आले. तेव्हा त्यांना या डोंगराईवर काहीतरी, दैविक गोष्टींचा साक्षात्कार झाला. डोंगराई मंदिरावर राजगुरू समर्थ रामदास स्वामी यांनी येथे मारुतीची व अन्य देवतांची स्थापना केल्याचे सांगितले जाते. सध्या आर्य समाजाचे देवीचे परमभक्त “पटवी बंधू भगिनी" व त्यांचे सर्व भागांत विखुरलेले अन्य नातेवाईक हे यासाठी डोंगराई परिसरात मोठी मदत करतात. या पुरातन मंदिरात अनेक देवी देवतांच्या पाषाण मूर्ती आहेत. वनराईने नटलेल्या या परिसरातील गगनचुंबी मंदिर एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत आहे.


No comments:

Post a Comment