खरसुंडी येथे श्रीसिद्धनाथांचे प्राचीन हेमांडपंथी मंदिर आहे. मंदिर परिसरात देखण्या दीपमाळा आहेत. नाथांच्या दर्शनासाठी राज्य-परराज्यातून भक्त येतात. नवरात्रोत्सवात बाळाबाई तथा योगेश्वरीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. श्री सिद्धनाथांचे मूळ ठिकाण म्हसवड, चिंचाळे गावच्या नयाबा गवळी सिद्धनाथाचे भक्त त्यांनी आपल्या भक्तीच्या बळावर गावच्या पूर्वेस असलेल्या डोंगरावर साकडे घातले. तिथे कपिला गायीच्या खरवसातून शिवलिंग साकारले. खरवस पिंडीवरून गावाला खरसुंडी हे नाव प्रचलित झाले. सिद्धनाथांना सात पत्नी होत्या. नाथांच्या मूर्ती सोबत बाळाबाई तथा योगेश्वरी विराजमान आहेत. यांसह विघ्नेश्वरी, मळाबाई, जनाई, जोगेश्वरी, छोटी जकाई व मोठी जकाई अशा देवींची मंदिरे परिसरात आहेत. योगेश्वरी देवीचे आंबेजोगाई येथील मूळ ठिकाण. उत्सवामध्ये पाचवेळा श्री नाथाची उत्सव पालखी सर्व लवाजम्यासह भेटीला येते. चैत्री यात्रेला सासनकाठी सोहळा, पौष पौर्णिमा, पारधी पौर्णिमा, तीन वर्षातून होणारी जकाई भेट यात्रा व नवरात्र उत्सवातील हर जागर सोहळा होत असतो. नवरात्रोत्सवात जोगेश्वरी मंदिरात पालखी मुक्काम असतो. यावेळी रात्री हर जागर व सकाळी साखर वाटप असा सोहळा होतो. श्री नाथांच्या मुख्य उत्सवात जोगेश्वरीच्या मूळ ठिकाणाहून त्यांचे मानकरी खरसुंडीत नैवेद्य व पूजा करून प्रत्येक वर्षी दर्शनासाठी येतात.
Thursday, October 14, 2021
खरसुंडीची सिद्धनाथ योगेश्वरी

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment