Saturday, October 23, 2021

तुमची सकाळ "आनंदी आनंद गडे" होण्यासाठी...


आपला दिवस छान जावा,कसली कटकट मागे लागू नये, असे प्रत्येकाला वाटत असते. पण यासाठी आपण सकारात्मक राहिले पाहिजे. सकाळी उठल्यापासूनच तसे प्रयत्न राहिले पाहिजे. सकाळी उठल्यावर आपण मनात चांगले विचार आणि चांगल्या गोष्टी पाहिल्या तर तुमची सकाळ हॅपी हॅपी होऊन जाते... सकाळी उठल्या उठल्या डोळ्यांसमोर तुमच्या आवडीच्या व्यक्तीचे चित्र (प्रतिमा) आणा. तुमच्या 'हिरो'ची प्रतिमा पाहा. चांगल्या विचारांच्या ओळी वाचा. रात्री झोपताना तुमच्या शेजारी जवळ प्रेरणादायी पुस्तक ठेवा,सकाळी उठल्यावर त्याची काही पाने वाचा. म्हणजे तुमच्या मनाला उभारी येईल. सकाळी उठताना मोबाईलकडे दुर्लक्ष करा. नाहीतरी दिवसभर मोबाईल तुमची पाठ सोडतच नाही,मग निदान सकाळी तरी त्याला काही काळ बाजूला ठेवा.

आणखी एक गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर अनेकांना आरसा पाहण्याची सवय असते. पण सकाळी झोपेतून उठल्यानंतर आरशात पाहू नये. कारण झोपेतून उठल्यानंतर तुमचा चेहरा, कपडे आणि बॉडी फ्रेश नसते. निस्तेज चेहरा आरशात पाहिल्यावर

तुम्ही आणखी निराश होऊ शकता. त्यामुळे चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन अगोदर फ्रेश व्हा. नंतर आरशात चेहरा पाहा. तुमचा फ्रेश चेहरा आरशात पाहून तुम्हाला आणखी उत्साह येईल आणि तुमचा दिवस छान जाईल.

सकाळी झोपेतून उठल्यानंतर न धुतलेली किंवा घाणेरडी कपडे परिधान करू नका. यामुळे तुमचा संपूर्ण दिवस खराब जाऊ शकतो. रात्री झोपतानाही घाणेरडे कपडे घालून झोपू नका. कारण त्यामुळे तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यावर मरगळल्या सारखे होईल. रात्री झोपताना घातलेल्या कपड्यांवरच सकाळी

वावरू नका. यामुळे तुमचा आळस आणखी वाढेल. सकाळी उठल्याबरोबर फ्रेश होऊन दुसरे स्वच्छ कपडे परिधान केल्यास तुमच्या अंगात उत्साह निर्माण होईल.

खूप उशिरा उठल्यावरही अंगात आळस असतो. त्यामुळे हॅप्पी गुड मॉर्निंगसाठी सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन बाहेर हवेशीर फिरायला जा. यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल तसेच आयुष्यही सुंदररित्या जगण्याचा मार्ग सापडेल.


No comments:

Post a Comment