अंकशास्त्राच्या या प्राचीन पद्धतीनुसार, ज्या लोकांचा मूलांक 4 आहे, असे लोक खूप मजेदार असतात आणि नेहमी हसतमुख असतात.
अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्रासारखेच एक शास्त्र आहे, ज्यामध्ये अंकांच्या मदतीने लोकांच्या भविष्याची माहिती मिळवता येते. हिंदीत याला अंकशास्त्र आणि इंग्रजीत Numerology असे म्हणतात. या प्राचीन विज्ञानात, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारीखातून एक मुख्य संख्या तयार होते, ज्याला मूलांक म्हणून ओळखले जाते. उदाहरणार्थ, महिन्याच्या 4, 13 किंवा 22 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो. असे म्हटले जाते की प्रत्येकाचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व एकमेकांपेक्षा वेगळे असते, हे मूलांकामुळे असू शकते.
जाणून घ्या मूलांक 4 बद्दल: असे म्हणतात की मूलांक नंबर 4 च्या लोकांचा स्वभाव खूप मस्त असतो. 4, 13 किंवा 22 तारखेला जन्मलेल्यांचा असा विश्वास आहे की जीवन मुक्तपणे जगले पाहिजे कारण ते एकदाच मिळते. त्यांच्या मते, उद्याची आशा नाही, त्यामुळे जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यावा.
चेष्टा-मस्करी करण्यात ते पुढे आहेत: अंकशास्त्राच्या या प्राचीन पद्धतीनुसार, मूलांक नंबर 4 असलेले लोक खूप मजेदार असतात आणि नेहमी हसत असतात.चेष्टा मस्करी करत असतात.या लोकांना आनंद वाटून घेण्यासाठी ओळखले जातो. दुसऱ्यांना आनंद वाटतात. असे म्हणतात की हे लोक स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम आहेत तसेच थंड डोक्याचे आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे लोक त्यांचे निर्णय अतिशय काळजीपूर्वक घेतात.
प्रेमविवाहावर विश्वास ठेवतात : असे म्हटले जाते की या राशीच्या लोकांवर सौंदर्याचा खूप प्रभाव असतो. असे म्हणतात की, आनंद वाटून घेणारे हे लोक अनेकांना त्यांचे दुःख सांगत नाहीत. आपल्या गोष्टी एखाद्या खास व्यक्तीसोबत शेअर करणाऱ्या या लोकांचा लव्ह मॅरेजवर खूप विश्वास असतो. तज्ज्ञांच्या मते, या मूलांकाच्या लोकांचे मित्र खूप सुंदर असतात.
No comments:
Post a Comment