Sunday, September 12, 2021

आपण आपले गुण ओळखावे...,

आपण आपले गुण ओळखावे...,

दोष सांगण्यासाठी लोक आहेतच.....

पाऊल टाकायचे असेल तर पुढे टाकावे..,

मागे ओढायला लोक आहेतच.....

स्वप्न पाहायचे असतील तर मोठेपणाचे पहावे..,

कमीपणा दाखवायला लोक आहेतच...!

*****

जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे ? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतो तो फक्त आपला निर्णय.

*****

दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर,

घड्याळ म्हणते काळाची पाऊले ओळख......

खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव, दुनियेचे भान ठेव....

देव्हारा म्हणतो पावित्र्य ठेव, मांगल्य जप......

छत म्हणते उच्च विचार ठेव, उच्च आकांक्षा ठेव.पण

जमीन....म्हणते पावले मात्र माझ्यावरच राहू देत....

*****

नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही, मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.

●●●●●●●●●●●●●●●


एका महिलेच्या व्रताने प्रसन्न होऊन देव बाप्पा प्रकट झाले आणि त्या महिलेला म्हणाले...'मुली, काय हवा तो वर माग!!'

ती महिला म्हणाली,'माझा नवरा माझ्याशिवाय कुठेही जायला नको..."

"अजून काही ?"

माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात माझ्यापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण काहीही नसावं...."

"अजून काही ?"

"मला बघितल्याशिवाय त्याला झोप येऊ नये ..."

"अजून काही?"

"जेव्हा तो सकाळी झोपेतून उठेल व डोळे उघडेल त्यावेळी सगळ्यात पहिले त्यानं मला बघावं..."

"अजून काही ?"

"आणि मला जरा देखील खरचटलं तरी वेदना माझ्या नवऱ्याला व्हाव्यात..."

"अजून काही?"

"बस... एवढं पुरेसं आहे देवा!"

"तथास्तु!"

आणि तात्काळ त्या महिलेचं रुपांतर स्मार्ट फोनमध्ये झालं...!!!


No comments:

Post a Comment