समर्थ रामदास नेहमी या गावातून त्या गावात भ्रमण करत असत. असेच ते एकदा मावळ प्रांतात भ्रमण करत होते. त्यांनी काही दिवस एका गावात राहण्याचे ठरवले. त्या गावात समर्थ रामदास स्वामी एकेका आळीमध्ये जाऊन पाच घरांत भिक्षा मागत असत. एका गावात कोणीतरी सांगितले की एक म्हातारी एकटी रहाते. ती कधीच कोणाला काही देत नाही. घरी गडगंज धन आहे. पण कुणाला कधी काही मदतही करत नाही. समर्थ त्या घरासमोर गेले व भिक्षा मागितली. ती म्हातारी घरातूनच ओरडली, की मी काही देणार नाही. माझ्याकडे देण्याजोगे काही नाही. तरी समर्थांनी प्रयत्न सोडला नाही. ते म्हणाले, तुझ्याकडे जे काही आहे ते तू दे. मला त्याचे वाईट वाटणार नाही. आता त्या म्हातारीला खूप राग आला. ती पुढे आली व अंगणातली मूठभर माती तिने समर्थांच्या झोळीत टाकली. समर्थांनी आशीर्वाद दिला व ते पुढे गेले.
असे ३-४ दिवस झाले. तेव्हा त्या म्हातारीने त्यांना विचारले, मी झोळीत माती टाकली तरी तुम्हाला राग येत नाही? काय करता तुम्ही या मातीचे ? तेव्हा समर्थ तिला म्हणाले, तुझ्याकडे देण्याजोगे खूप आहे; पण तुझ्याजवळ दानत नाही. कमीत कमी माती तरी देण्याची सवय तुझ्या हाताला लागू दे. ती लागली तर अजूनही बरेच काही तू देऊ शकशील.
तात्पर्य : सत्कार्यासाठी दान देणे हा एक संस्कार आहे. तो संस्कार रुजला तर आपल्या जवळची प्रत्येक चांगली गोष्ट समाजाला द्यायची इच्छा होते. पण समाजकार्यासाठी वेळ द्यायची एकदा सवय लागली की त्यातून समाजकार्यासाठी आपले सगळे जीवन समर्पित करणारे कार्यकर्ते तयार होतात.
@@@@@@@@@@@@@@@@
काल नेट बंद होते म्हणून रात्री ८ वाजता जेवण झाल्यावर लगेच झोप आली, घरच्यांनी उचलून दवाखान्यात नेले म्हणे आमचा पोरगा रात्री २-२ वाजेपर्यंत जागतो आज बेशुद्ध का झाला?
No comments:
Post a Comment