जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे यांचा त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल विविध संघटनांच्यावतीने सहकुटुंब सत्कार करण्यात आला आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने चालवण्यात आलेल्या आश्रमाशाळांच्या उभारणीपासून मुख्याध्यापक या पदावर कार्यरत राहिलेले आणि शिक्षण संस्था नावारूपाला आणतानाच संस्थेचा विस्तार करण्यात मोलाचा हातभार लावलेले श्री. कारंडे या महिन्यात आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले.
Sunday, June 28, 2020
Sunday, May 31, 2020
चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करा आणि देश आत्मनिर्भर बनवा -सोनम वांगचुक
भारताला चीनविरोधातील युद्ध जिंकायचे असल्यास भारतीयांना चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असे मत प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी व्यक्त केले आहे. २0१८ साली रेमन मॅगसेसे पुरस्कार जिंकणार्या वांगचुक यांनी युट्यूबवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामधून त्यांनी भारतीय खूप मोठय़ा प्रमाणात चीनला प्रत्यक्षपणे आर्थिक मदत करत असतात असे म्हटले आहे. एकीकडे भारतीय सैन्य चीनला गोळ्यांनी म्हणजेच बुलेट्सने उत्तर देत असतानाच मुंबई, दिल्ली, बेंगळुरूबरोबरच देशातील सर्व भागांमधील नागरिकांनी चीनला पाकिटातून म्हणजेच वॉलेटच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे असे मत वांगचुक यांनी व्यक्त केले आहे.
कवी महादेव बुरुटे : उभं आयुष्यच लाॅकडाऊन
ध्यानीमनी नसताना भारतात कोरोना व्हायरस ने छुपा प्रवेश केला आणि त्याच्या विघातकतेमुळे माणसांचं जगणंच सावधगिरीचा उपाय म्हणून लॉकडाऊन झालं. पायाला आधुनिकतेची चक्रं बांधलेल्या सर्वांना घरात कोंडून ठेवल्यासारखे झाले आहे. पण ही वेळच अशी आहे - आपल्यासाठी, घरच्या लोकांसाठी, आपल्या लाडक्या मुलाबाळांसाठी हे आज गरजेचे आहे. चाळीस एक दिवस ही अवस्था अनुभवत असताना लोकांना बांधून घातल्यासारखे झाले आहे. पण उभं आयुष्यच ज्याच्या नशिबी लॉकडाऊन आहे त्यांचं काय? असेच आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती व ध्येयनिष्ठेने वाटचाल करीत आपलं असह्य जीवन विविध लोकोपयोगी, समाजाभिमुख मार्गानी सुसह्य करीत हसतमुखाने परिस्थितीला सामोरे जाणारे शेगांव येथील कवी, साहित्यिक महादेव बुरुटे.
Friday, May 29, 2020
उत्तम प्रशासक :मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे
सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ, सनमडी संचलित राजर्षी शाहू महाराज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे हे 31 मे रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. संस्थेची मुहूर्तमेढ लावलेल्या श्री . कारंडे सरांनी आपल्या कामांतून संस्थेच्या विस्ताराला मोलाचा हातभार लावलाच शिवाय तालुक्यात संस्थेची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांनी आपल्या तालुक्यातील भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी या शिक्षण संस्थेची निर्मिती केली.
Friday, May 22, 2020
Thursday, May 21, 2020
खरीपपूर्व मशागतींची धांदल सुरू
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सध्या सांगली जिल्ह्यात खरीपसाठी मशागतींची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यंदा वेळेवर मान्सून दाखल होणार असल्याच्या वार्तेने मशागती कामांची धांदल उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शेत मशागतींच्या कामांना विलंब झाला होता. दरम्यान यंदा खते शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधवरच उपलब्ध केली जाणार आहेत.

Wednesday, May 13, 2020
पुराचे पाणी दुष्काळी भागात देण्याविषयी जयंत पाटील यांचा निर्णय स्वागतार्ह
प्रकाश जमदाडे
जत,(जत न्यूज वृत्तसेवा) -
पुराचे पाणी दुष्काळी भागात देण्यविषयी जो निर्णय मंत्री जयंत पाटील यांनी घेतला आहे, तो निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया बाजार समितीचे माजी सभापती व रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील साहेब यांनी पूराचे पाणी दुष्काळ तालुक्यास देणेसाठी पाटबंधारे खात्याला प्रस्ताव तयार करणेच्या सुचना दिल्या आहेत. या निर्णयाचा आम्ही स्वागत करीत आहोत. सन २००५ सालापासून आम्ही याची मागणी करीत आहोत कारण, जत तालुक्यात एकही बारमाही नदी नाही पावसाचे प्रमाण आतिश्य कमी आहे.

Subscribe to:
Posts (Atom)