Sunday, March 29, 2020

आमदार सांवत यांच्याकडून आरोग्य यंत्रणेसाठी 10 लाखाचा निधी

जत तालुक्यात सर्व यंत्रणा दक्ष
जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात कोरोना विषाणु प्रभाव रोकण्यासाठी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी आमदार निधीतून 10 लाख रूपयाचा निधी दिला आहे.तसे पत्र प्रशासनाला आ.सांवत यांनी आज रविवारी दिले.  या विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी सर्वोच्च खबदारी घ्या,कसल्याही परिस्थिती निधी कमी पडू देणार नाही,असे आश्वासन ही आ.सांवत यांनी प्रशासनाला दिले. देशामध्ये कोरोना या रोगाने थैमान घातले आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत. या कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी तातडीने उपाय योजना करता याव्यात  यासाठी विशेष बाब म्हणून आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय यंत्र सामुग्री व साहित्य तात्काळ उपलब्ध करून देता यावी, म्हणून राज्य सरकारने आमदारांना त्यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमा अतर्गंत 50 लाख रूपये पर्यंत खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कामगार सेना व जत लायन्स क्लबच्यावतीने पोलिसांना रुमाल वाटप

जत,(प्रतिनिधी)-
संपूर्ण जगभरात सध्या कोरोना व्हायरस ने थैमान माजवल्याने मानवजातीवर मोठे संकट ओढवले आहे. भारतात सध्या 900 चा आकडा पार केला असून सर्वाधिक महाराष्ट्र राज्यात आहेत. याचीच खबरदारी म्हणून केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. यासाठी 24 तास आपले पोलिस प्रशासन व डाॅक्टर आपल्या साठी झटत आहेत.आपणही यांना सहकार्य करत घरी राहून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

Saturday, March 7, 2020

जतच्या भूमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ

पाणी संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा
उमदी,(प्रतिनिधी)- 
   जत येथील भूमी अभिलेख कार्यालयात  मनमानी  व  बेपर्वा  कारभारामुळे नागरिक हैराण झाले असून कर्मचाऱ्याचा  आढमुठी धोरणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. दिवसा-ढवळ्या आर्थिक लुबाडणूक होत असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन कारभारात सुधारणा करावी अन्यथा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा तालुका पाणी संघर्ष समितीने केली आहे.

Friday, February 28, 2020

दुर्मिळ औषधी वनसंपदा जपा: डाॅ. विनोद शिंपले

जत,(प्रतिनिधी)-
भारत हा जैवविविधतेने समृद्ध देश असून अनेक दुर्मिळ वनौषधींचा खजाना आहे. या दुर्मिळ औषधी वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी युवा पिढीने प्रामाणिक प्रयत्न करावा असे प्रतिपादन डाॅ. विनोद शिंपले यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे  राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वनस्पतीशास्त्र विभाग, सायन्स असोसिएशन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत "औषधी वनस्पती: ओळख व संवर्धन" या एक दिवसीय कार्यशाळेत 'पश्चिम घाटातील औषधी वनसंपदा' या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे होते.

वाचण्यातून, बोलण्यातून भाषा समृद्ध होते : लवकुमार मुळे

जत,(प्रतिनिधी)-
आपल्या सभोवताली जे घडते, आपण जे पहातो, अनुभवतो आणि आपण जे वाचन करतो त्यातून आपले व्यक्तीमत्व तर घडतेच, पण त्यातून आपली भाषा समृद्ध होण्यासाठीही मदत होते. त्यासाठी सर्वांनी वाचन, मनन, निरीक्षण आणि जाणीवपूर्वक मराठीचा वापर केला पाहिजे, असे मत कवी लवकुमार मुळे यांनी मराठी साहित्य सेवा मंच, शेगांव व कविवर्य नारायण सुर्वे कवी मंच, रड्डे यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शेगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

Wednesday, February 26, 2020

शाळेत मराठीची सक्ती योग्य, भाषा विकासासाठी हवे प्राधिकरण

मराठीच्या संवर्धनासाठी व्यापक उपाययोजनांची गरज : मराठीतील विविध बोलीभाषांचेही व्हावे जतन
जत,(प्रतिनिधी)-
मराठी ही आपली मातृभाषा. अमृतातेही पैजा जिंके, असे मराठीचे वर्णन संत ज्ञानेश्‍वरांनी केले आहे. मात्र, आज मराठीची अवस्था काय आहे? मराठीला वैभवाचे दिवस आणण्यात आपण सर्व तिची लेकरे कमी पडत आहोत. शासकीय कामकाजात मराठी भाषा असली तरी ती घरातून मात्र हद्दपार होत आहे. आता शासनाने अभ्यासक्रमात मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे मराठीच्या संवर्धनाला हातभार लागेल. पण केवळ एवढय़ावर भागणार नाही तर मराठीसाठी स्वतंत्र प्राधिकारणही हवे, अशी मागणी केली जात आहे.

Tuesday, February 25, 2020

भोंदू बाबाने केले पाच बहिणींवर अत्याचार

पुत्रप्राप्ती आणि घरात असलेले गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीमध्ये २२ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत हा संतापजनक प्रकार घडला आहे. पिंपरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत या भोंदूच्या मुसक्या आवळल्या आहेत.