जत,(प्रतिनिधी)-
संपूर्ण जगभरात सध्या कोरोना व्हायरस ने थैमान माजवल्याने मानवजातीवर मोठे संकट ओढवले आहे. भारतात सध्या 900 चा आकडा पार केला असून सर्वाधिक महाराष्ट्र राज्यात आहेत. याचीच खबरदारी म्हणून केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. यासाठी 24 तास आपले पोलिस प्रशासन व डाॅक्टर आपल्या साठी झटत आहेत.आपणही यांना सहकार्य करत घरी राहून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
यासाठी सदैव जत कामगार सेना व लायन्स क्लब सामाजिक बांधिलकी जपत आपले कार्य करीत असतात .या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंध उपाय म्हणून आपल्या साठी कायम कर्फ्यू च्या वेळी रस्त्यावरती थांबून सेवा बजावत असतात. त्यासाठी जत उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलिस निरीक्षक आर आर शेळके, गोपनीय विभाग प्रमुख जवंजाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे, लायन्स क्लब रिजनल चेअरमन राजेन्द्र आरळी आपल्या पोलिस बांधवांना त्यांच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून पांढरे शुभ्र रुमाल वाटप केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक सुभाष कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल व्हनखंडे व इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment