Saturday, March 7, 2020

जतच्या भूमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ

पाणी संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा
उमदी,(प्रतिनिधी)- 
   जत येथील भूमी अभिलेख कार्यालयात  मनमानी  व  बेपर्वा  कारभारामुळे नागरिक हैराण झाले असून कर्मचाऱ्याचा  आढमुठी धोरणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. दिवसा-ढवळ्या आर्थिक लुबाडणूक होत असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन कारभारात सुधारणा करावी अन्यथा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा तालुका पाणी संघर्ष समितीने केली आहे.

           जत येथे भूमीलेख (सिटी सर्व्ह) कार्यालय कार्यरत आहे.  तालुक्यातच इतर शासकीय  कार्यालयाच्या तुलनेत भूमी अभिलेख कार्यालयात प्रचंड गोधळ सुरू आहे. एका दिवसाचे काम महिनाभरात होऊ शकत नाही  कामासाठी दररोज जतला हेलपाटे घालावे लागत आहे.  दररोज एक ना अनेक कारणे सांगून कर्मचारी आर्थिक लुबाडणूक करत आहेत.  शिवाय पैसे देऊनही  वेळेवर दाखले मिळत नसल्याने नागरिक वैतागले आहेत.   
            या कार्यालयाच्या कारभारामुळे अनेक नेते मंडळी अनेक वेळा नाराजी व्यक्त केली आहेत, मात्र या बेताल व बेपर्वा कर्मचाऱ्याबद्दल  कुणीच कांही करू शकला नाही. त्यामुळे येथील कर्मचारी वर्ग धजावत नाहीत.  त्यामुळे येथील कर्मचारी उलट उद्धट बोलत कुणाला कुठेही तक्रार केली तरी आमचे कोणी कांही करू शकत नसल्याचे स्पष्ट बोलत असतात.  त्यामुळे  या कर्मचाऱ्यांच्या आडमुठी कारभारामुळे  नागरिकांना  वेळ , पैसे  खर्च करूनही कामे होत नसल्याने संतापले आहेत.  वेळीच कारभारात सुधारणा व्हावे अन्यथा तालुका पाणी संघर्ष समितीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment