सांगली:
सांगली येथे आज सकाळी झालेल्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत शिक्षकांमध्ये जोरदार हाणामारी झाली.ही हाणामारी सभा सुरू असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झाली. यावेळी शिक्षकांनी एकमेकांना अक्षरशः उरावर बसून बेदम मारहाण करत होते. अलिकडे शांततेत पार पडणारी ही सभा पुन्हा चर्चेत आली आहे. या प्रकारामुळे शिक्षकी पैशाला काळिमा फासला गेला.
आज शिक्षक बँकेच्या सभेत एकच गोंधळ उडाला. भ्रष्टाचार आणि अन्य काही मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच दोन गट व्यासपीठावर आले आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी सभागृहातील वातावरणही तापले आणि सभागृहातील खुर्च्याही फेकण्यात आल्या. या मारामारी वेळी कोणीतरी सभागृहातील लाईट घालवल्याने पुन्हा जोरदार राडा झाला. सभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे शिक्षक बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले. शिक्षकच मारामारी करू लागले तर ते विद्यार्थ्यांवर कसले संस्कार करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Saturday, September 8, 2018
जि. प. पदाधिकारी बदलाच्या हालचाली थंडावल्या?
गणेशोत्सवानंतर निर्णय होण्याची शक्यता; इच्छुक नाराज
जत,(प्रतिनिधी)-
जिल्हा परिषद पदाधिकारी कार्यकाल सव्वा वर्षे झाला असल्याने पदाधिकारी बदलाची मागणी होऊ घातली आहे. मात्र वरिष्ठ स्तरावरून हिरवा कंदील न मिळाल्याने इच्छुक मंडळी नाराज दिसत आहेत. जत, तासगाव, मिरज तालुक्यातील भाजप सदस्य तसेच वाळव्याच्या रयत विकास आघाडीने बदलाची जोरदार मागणी केली आहे. ‘पदाधिकारी बदलाबाबत विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कानांवर गेलेला नाही. त्यांच्या संमतीशिवाय पदाधिकारी बदलले जाणे अशक्य आहे.
जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्यांना सव्वा वर्षे झाली आहेत. सांगली महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर पाहू, असे नेत्यांनी काही इच्छुकांना सांगितले होते. महापालिका निवडणूक झाल्याने इच्छुकांनी पदाधिकारी बदलाची मागणी पुन्हा उचलून धरली आहे. काही सदस्य व नेत्यांनी महिन्याभरापूर्वी पालकमंत्री देशमुख यांची भेट घेतली होती. मात्र पदाधिकारी बदल गणेशोत्सवानंतर होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजप आघाडीचे संख्याबळ 35 आहे. भाजपचे 23 व भाजप पुरस्कृत 2 (ब्रह्मदेव पडळकर व प्रमोद शेंडगे) सदस्य, शिवसेना 3, रयत विकास आघाडी- 4, अजितराव घोरपडे गट 2 व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 1 सदस्य आहेत. सव्वा-सव्वा वर्षाने बदल केल्यास अनेक इच्छुकांना संधी मिळेल, असा मुद्दा उपस्थित करत 35 पैकी 16 ते 19 सदस्यांनी बदलाची मागणी केल्याचे समजते.
पदाधिकारी बदलासाठी जत तालुका आघाडीवर आहे. जत तालुक्यातील भाजपचे सदस्य सरदार पाटील, सुनीता पवार, स्नेहलता जाधव, रेखा बागेळी, मंगल नामद या पाच सदस्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व खा. संजय पाटील यांना विनंती पत्र दिले आहे. जि.प.च्या विद्यमान पदाधिकार्यांची मुदत सव्वा वर्षापेक्षा जास्त झाली आहे. ठरल्याप्रमाणे पदाधिकार्यांचे राजीनामे घ्यावेत. जत तालुक्याला अध्यक्षपद द्यावे, असे पत्रात म्हटले आहे.
मिरज तालुक्यातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची भेट घेतली आहे. सव्वा वर्ष झाल्याने पदाधिकारी बदलासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र देण्याची विनंती केली आहे. घोरपडे गटही पदाधिकारी बदलात संधीच्या अपेक्षेत आहे. मिरज तालुक्यातील भाजपच्या सहा सदस्यांनी पदाधिकारी बदलाची मागणी केल्याचे बोलले जात आहे
जत,मिरज पदाधिकारी बदलासाठी आघाडीवर असले तरी पलूस,कडेगाव, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील कार्यकर्ते मात्र या बदलाला फारसे उत्सुक दिसत नाहीत. कारण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे पलूस व कडेगाव तालुक्याचे भाजप नेते आहेत. उपाध्यक्ष सुहास बाबर खानापूर येथील आहेत, शिवाय त्यांच्या पाठिशी शिवसेनेचे सर्व सदस्य आहेत. दरम्यान, नेतेमंडळी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे राजेंद्रअण्णा देशमुख यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेले आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाच्या मागणीपासून पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडीतील भाजप आघाडीचे सदस्य दूर आहेत.
खा. संजय पाटील यांचे चुलते डी. के. पाटील हे अध्यक्षपदासाठी प्रबळ इच्छुक आहेत. तर अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विश्वासातील समजले जातात. त्यामुळे बदलाबाबतचा निर्णय औत्सुक्याचा ठरला आहे. महाडिक भेटले पालकमंत्री सुभाष देशमुख यांना रयत विकास आघाडीतील नेते राहुल महाडिक यांनी मागे पालकमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेतली होती. सव्वा वर्ष झाल्याने जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल व्हावा व रयत विकास आघाडीला पुन्हा संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. पदाधिकारी बदलाच्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल. बदल करायचा अथवा नाही याबाबत तेच निर्णय घेतील, असे ऐकायला मिळाले आहे. मात्र आता गणेशोत्सवाचा काळ असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा विषय जरी गेला तरी त्यांच्याकडून लवकर हिरवा कंदील मिळण्याची शक्यता नाही.त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यावा लागणार आहे. उत्सव काळातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पाहता त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून सांगली जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाचा विषय मुख्यमंत्री यांच्या कानावर जाणे अवघड आहे. हा बदलाचा निर्णय हा गणेशोत्सवनंतर होण्याची शक्यता अधिक आहे.
जत तालुक्यातल्या 18 गावांनी केली पाण्याच्या टँकरची मागणी
पन्नासहून अधिक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई; सहा गावांसाठी कुपनलिका अधिग्रहीत
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची ट्ंचाई तीव्र झाली असून पन्नासहून अधिक गावांना याची मोठी झळ बसू लागली आहे. सध्या 18 गावांनी पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी तालुका प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, सहा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी प्रशासनाकडून परिसरातील कूपनलिका अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
पूर्व भागातील माडग्याळ या महत्त्वाच्या आणि लोकसंख्येने अधिक असलेल्या गावाला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. प्रशासनाने यासाठी परिसरातील 8 कूपनलिका आणि विहिरी अधिग्रहीत करून गावाला पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हा प्रयत्न अपुरा पडत आहे. गेल्या पावसाळ्याच्या तीन महिन्यात तालुक्यात तुरळक पाऊस वगळता एकही दमदार पाऊस झाला नसल्याने मोठे संकट ओढवले आहे. खरिप कधीचा वाया गेला आहे.परंतु, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील आ वासून उभा राहिला आहे. लोकांना दोन-तीन किलोमीटर अंतरावरून सायकलवरून, डोक्यावरून, खांद्यावरून पाण्याच्या घागरी वाहून आणाव्या लागत आहेत.
जतच्या पूर्व आणि पश्चिम भागात पाणी टंचाईची तीव्रता मोठी आहे. कोंतेबोबलाद, अंकलगी, सोनलगी, काराजनगी, व्हसपेट, सोन्याळ, हळ्ळी,कोणबगी, आसंगी (जत), पांढरेवाडी, लमाणतांडा (दरिबडची), तिल्याळ, दरिबडची,माडग्याळ, अंतराळ, अचकनहळ्ळी, एकुंडी, गुगवाड या गावांनी गावाला पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे आहे. दरम्यान, सध्या टँकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आल्याने सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत. सध्याच्या परिस्थितीत तालुक्यात 50 हून अधिक गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी झळ बसत आहे. ऐन पावसाळ्यातील ही पाणीटंचाई लोकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. सध्या सणासुदीचे दिवस असून पाण्याची गरजदेखील मोठी असते. ही गरज भागवताना लोकांची दमछाक होत आहे.
सध्या प्रशासनाने बागलवाडी, माणिकनाळ, माडग्याळ, तिकोंडी, शिंगणापूर, कोणबगी या सहा गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याच्यादृष्टीकोनातून परिसरातील कुपनलिका अधिग्रहीत आहेत. परंतु, तरीही पाणी टंचाई जाणवत असल्याने यातील काही गावांनी टँकरची मागणी केली आहे. गेल्या तीन महिन्यात जत तालुक्यात आतापर्यंत फक्त 144.6 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. या कालावधीत सरासरी 270 मिलिमीटर पाऊस पडत असतो. शिवाय पूर्वभागात तर अजिबातच पाऊस झाला नसल्याने शेतकर्यांनी खरिपाच्या पेरण्याच केल्या नाहीत. आणि ज्यांनी पेरण्या केल्या होत्या, त्या पूर्णपणे वाया गेल्या आहेत. सरकारने पंचनामे करून शासकीय मदत देण्याची गरज असून मात्र याबाबत कोणतेच पाऊल उचलले जात नसल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
व्हॉटस् अप:जरा शांतपणे विचार करा
जरा शांतपणे विचार करा
10 वर्षांपूर्वी 35
ते 40 अंश सेल्सियस असलेल्या तापमानाने आज
43 चा आकडा पार केला आहे. पुढील साधारण
5 वर्षात पारा 45 अंशाची पातळी ओलांडेल.
असे करत करत एक दिवस पारा 60 अंशांवरसुद्धा पोहोचेल.
तेव्हा अशी रडायची वेळ येईल, की आहे ती झाडेही
वाळतील. तुमचा हजारो रुपयांचा एसीसुद्धा काम करु शकणार नाही.
दिल्लीवाले पण बुलेट ट्रेनने पाणी पाठवणार नाहीत. आपला जिल्हा, राज्य आणि पर्यायाने देश वाळवंट व्हायला
वेळ लागणार नाही. हे टाळण्यासाठी काय कराल? पावसाळा सुरु आहे. प्रत्येकाने किमान 5 झाडे लावा. 3 वर्ष पोटच्या मुलासारखे त्यांचे संगोपन
करा. पाणी वाचवण्याचा आणि जिरवण्याचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत
पोहोचवा. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा.
5 वर्षात 2 कोटी 50 लाख झाडे
लावा! मनापासून विचार करा आणि कामाला लागा..! दर रविवारी घरातून बाहेर पडा आणि सुट्टीचा एक दिवस पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी
द्या.
तहान लागलेली असताना कोरड्या ओठांतून गोडच शब्द बाहेर पडतात. मात्र, एकदा का तहान भागली, की
मग ‘पाण्याची चव‘ आणि ‘माणसाचे नशीब‘ दोन्ही बदलतात. जोपर्यंत
ठीक आहे, तोपर्यंत देवाला दुरूनच हात जोडतात थोडेसे काही कमी
पडायला लागले, की लगेच देवळात जाऊन नारळ फोडतात.
बायको : त्रिदेवमध्ये
तीन नायिका कोणत्या होत्या?
नवरा : माधुरी
दीक्षित, संगीता बिजलानी आणि सोनम
बायको : 2003 विश्वचषकमध्ये पाकिस्तान विरुद्ध सचिनने किती धावा केल्या?
नवरा : 98 धावा
बायको : आपल्या बाजूची कविता आपल्या बिल्डिंगमध्ये कधी
राहायला आली?
नवरा : बुधवारी
दोन महिने पूर्ण होतील. पण तू असे प्रश्न का विचारतेस?
बायको : काल माझा
वाढदिवस होता!
भयाण शांतता.
whatsup.आयुष्य बिनधास्त जगायचे.
आयुष्य बिनधास्त जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही. कुणाचे वाईट चिंतायचे नाही.
कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी
प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात
पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री
कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज
होऊन बसतात. ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण? कुणी
कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो. आपण त्याच्या
विषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्ट वक्ते पणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात
डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त
स्वतः बरोबर दुसर्याचे हीत चिंतायचे. कुणाच्या
पुढेपुढे करायचे नाही. ‘जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची.‘
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.
‘काय करू? ती नर्स
‘घाबरु नका, नर्व्हस होऊ नका, लहान ऑपरेशन आहे, हिम्मत बाळगा...’ असे सारखे सारखे सांगत होती.’ ‘चांगलेच तर सांगत होती
ना, मग पळून का आलास?’
‘अरे ती ते डॉक्टरांना सांगत होती ना!
लमाणतांडा (दरिबडची) आश्रमशाळेचे यश
जत,(प्रतिनिधी)-
जिल्हास्तरीय एथलेटिक्स स्पर्धेत जत तालुक्यातील लमाणतांडा (दरिबडची) येथील माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. ऋतिक रमेश राठोड या विद्यार्थ्याने 600&100 मीटर धावणे तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर सचिन प्रकाश राठोड (600 मीटर ) याने चौथा ,कु.जयश्री कोयनाप्पा कुलाळ ( 600 मीटर ) हिने चौथा व कु.शितल दाजी लेंगर (600मीटर ) हिने पाचवा क्रमांक पटकावला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक पी.जी.बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हास्तरीय एथलेटिक्स स्पर्धेत जत तालुक्यातील लमाणतांडा (दरिबडची) येथील माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. ऋतिक रमेश राठोड या विद्यार्थ्याने 600&100 मीटर धावणे तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर सचिन प्रकाश राठोड (600 मीटर ) याने चौथा ,कु.जयश्री कोयनाप्पा कुलाळ ( 600 मीटर ) हिने चौथा व कु.शितल दाजी लेंगर (600मीटर ) हिने पाचवा क्रमांक पटकावला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक पी.जी.बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले.
राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागास शिवाजी विद्यापीठाचा द्वितीय पुरस्कार
जत,(प्रतिनिधी)-
राजे रामराव महाविद्यालय जत ला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने यावर्षीचा उत्कृष्ट महाविद्यालय व डाॅ. राजेंद्र लवटे यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून सांगली जिल्हा स्तरीय द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी दिली.
राजे रामराव महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने मागील तीन वर्षात राबविलेले विविध नियमीत व शिबिरातील उपक्रम तसेच महाविद्यालय परिसरात तयार करण्यात आलेला पाझर तलाव व 1000 पेक्षा केलेली वृक्ष लागवड व ठिबक सिंचन करून केलेले वृक्षसंवर्धन याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान केला आहे. सदर पुरस्कार मिळवण्यात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, स्वयंसेवक यांनी कष्ट घेतले असून यावर्षीदेखील विविध उपक्रम राबवून प्रथम पुरस्कार मिळवण्याचा मानस डाॅ. राजेंद्र लवटे यांनी व्यक्त केला.
Subscribe to:
Posts (Atom)

