Monday, August 23, 2021

खळखळत जगा.. नितळ झऱ्यासारखं शुद्ध..!!


शांत डोहावर कधी विश्वास ठेवू नये.. खोल बरंच काही कुजलेलं मिळतं. उथळ वाहणारं नितळ पाणीच उत्तम, पिण्यायोग्य असतं. माणूसही तसाच असावा! त्याच्या स्वभावात खळखळाटच असावा असं नाही, पण कमालीचा शांतपणा मात्र मुळीच नसावा, कधी कधी या सायलेंटखाली  त्याचं दबलेलं पूर्वआयुष्य मिळेल. उलट कधी पूर्णत: घमेंड, कुजकेपण याचा दर्प खोल आत दिसेल. सतत वाहत रहावं नितळ झऱ्यासारखं, लोकं म्हणू देत उथळ पाण्याला खळखळाट फार... तो खळखळाटच पाणी शुद्ध ठेवतो. डोह कधी कधी तळाशी घमेंड, कुजकेपणा या असल्या पदार्थांनी कुजका निघू शकतो. बेफिकीरपणे मांडावं, आपण आहोत तसे. लोकं मग ठरवतील तुमचा बरे वाईटपणा... स्वच्छंदीपणा हवा जगण्यात वागण्यात फक्त नैतिकतेचा लगाम हवा त्याला.. बाकी उधळा जगणं मुक्त हस्ताने... आयुष्य फार सुंदर आहे, ते असं कुजकेपणाणे कुणी वाया घालू नये बिनधास्त तारीफ करा, एखाद्या सुंदरतेची एखाद्या फुलाची, वेलाची, निसर्गाची आणि सुंदर एखाद्या मुलीचीही बरं का.. तिला तिची सुंदरता कळू द्या.. आवडली तर आवडली म्हणा, बिनधास्त... सगळे विकार अपेक्षा बाजूला ठेवुन मात्र..!

कुद्न मुळीच जगू नका, आयुष्य विश्वाचा वेळ पाहता फक्त तसूभर आहे... दिलखुलास जगा. सगळं उपभोगलं पाहीजे. थरार, आनंद, सुंदरता, आव्हानांना सामोरं जाण्यात आणि त्यानंतरच्या जिंकलेपणात जो आनंद असतो तोसुद्धा वेचता आला पाहीजे. डब्यासारखं एकाच ठिकाणी बसून जमत नाही. चारीआर मनाला घुमवलं पाहीजे. वैराग्याची भगवी वस्त्रे कधीच परिधान करु नका. कारण ती घातल्याने आतल्या चेतना मरत नाहित. सर्व आसक्ती जीवंत असू द्या, त्या जिवंत असणं हे आपण जिवंत असण्याचं लक्षण आहे. त्यांना फक्त सुंदरतेची झालर असू द्या, मग त्यांचं उपभोगणंही सुंदर होऊन जाईल. जगणही सुंदर होवून जाईल! खळखळत जगा.. नितळ झऱ्यासारखं शुद्ध..!!

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

'स्त्री'

एका संध्याकाळी सूर्य बुडत असतांना तिला तिच्या नातीने विचारले,"आज्जी, स्त्री म्हणजे काय असते गं ?"

सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याने, मोतीबिंदू झालेल्या डोळ्याने ती झट्कन बोलली, 

"स्री सुद्धा मनुष्य असते. तिला तिचे आयुष्य असते

तुडवली तर नागीण असते.

डिवचली तर वाघीण असते.

कडाडली तर वीज असते.

तान्ह्या बाळाची नीज असते.

आणि बरं का पोरी, तिच्याच गर्भात भविष्याचे बीज असते!"

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

पेशंट : डॉक्टर, मला नवीन त्रास सुरू झालाय.

मी दुसरं वाक्य बोललो की, पहिलं वाक्य विसरुन जातो.

डॉक्टर : हा त्रास तुम्हाला कधीपासून आहे ?

पेशंट : कसला त्रास ?


Monday, August 16, 2021

कवी लवकुमार मुळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य सेवा मंचच्यावतीने सत्कार


जत,(जत न्यूज)-

जत तालुक्यातील शेगाव येथील कवी लवकुमार मुळे यांच्या कवितासंग्रहांना पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य सेवा मंच,जतच्यावतीने चिंच विसावा येथे सत्कार करण्यात आला. मुळे यांच्या 'कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे' व 'कवीने पिंजून घ्यावा भोवताल' या कवितासंग्रहांना शब्दांगन संस्था, चंद्रपूरचे यांचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार  मिळाला आहे. साहित्य सेवा मंचचे अध्यक्ष व पत्रकार किरण जाधव, साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे, प्रा, कुमार इंगळे, 'चिंच विसावा'चे व्यवस्थापक  प्रल्हाद बोराडे, सौ,बोराडे. अनिकेत ऐनापुरे आदी उपस्थित होते.

लवकुमार मुळे शेगाव यांचे आतापर्यंत 'गुलमोहर' , 'भावमुद्रा', 'काळीजवेणा', 'अर्ध वेलांटी', 'कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे', 'कवीने पिंजून घ्यावा भोवताल' आदी कवितासंग्रह प्रकाशित आहेत. 'कोलाहल' व 'आत्म संवादाचे पांढर पक्षी' हे संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या कवितासंग्रहांना शब्दांगण पुरस्कार( मिरज), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचा विशेष पुरस्कार ,कै सुरेश कुलकर्णी पुरस्कार, औदुंबर सहित्याज्योती पुरस्कार (बीड), श्रीमती शहाबाई यादव साहित्य पुरस्कार (रेनावी), बेळगावचा वाङ्मय चर्चा मंडळाचा कृ. ब. निकुंभ साहित्य पुरस्कार मिळाले आहेत तर साहित्य प्रतिष्ठान, पुणेचा प्रतिभा गौरव पुरस्कार नुकताच घोषित झाला आहे.

प्रा.निर्मला मोरे यांना पी.एचडी. मिळाल्याबद्दल सत्कार


(प्रा.निर्मला मोरे यांचा सत्कार करताना मच्छिंद्र ऐनापुरे, अरुण शिंदे आणि प्रा.कुमार इंगळे.)

जत,(जत न्यूज)-

जत येथील राजे रामराव महाविद्यालयातील प्रा.निर्मला वसंत मोरे यांना पी. एचडी. मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे, मराठा सेवा संघाचे अरुण शिंदे व प्रा.कुमार इंगळे उपस्थित होते.

प्रा.निर्मला मोरे यांना शिवाजी विद्यापीठाची 'समकालीन मराठी ग्रामीण कथेतील स्त्री जीवन' या विषयावर पी. एचडी. मिळाली आहे. याबद्दल साहित्य सेवा मंचच्यावतीने साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.निर्मला मोरे या नववी पास होत्या. लग्नानंतर शिक्षण घेऊन त्या प्राध्यापक झाल्या.त्यांनी ग्रामीण स्त्री जीवन जवळून पाहिले असून साहित्यातील स्त्री जीवनाचा अभ्यास केला आहे.

Friday, June 4, 2021

सहवासाचा परिणाम

 


*सहवासाचा परिणाम*

सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याच सुरेख उदाहरण आचार्य विनोबांनी दिले होते.

ते म्हणतात, की आकाशातून पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो. तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही… तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्यांचं अस्तित्वच संपून जाते, तो नष्ट होतो. कमळाच्या पानावर पडला, तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला, तर प्रत्यक्ष मोतीच बनतो…

थेंब तोच, परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्यांचं अस्तित्व त्याची पत प्रतिष्ठा अवलंबून असते…!

¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿

कुणीतरी फुलाला विचारले,

झाडावरून तोडले तेव्हा

तुला वेदना झाल्या नाहीत का रे?

फुलाने उत्तर दिले,

तोडणारा इतका आनंदात होता की,

मी माझ्या वेदनाच विसरून गेलो.

¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿

मानवी जीवन यशस्वी व्हायचा

तडजोड हाही एक मार्ग आहे……

माणसाने ती करायला शिकलं पाहिजे;

जिथं जिथं तडा जाईल,

तिथं तिथं जोड देता आला की,

कुठलंच नुकसान होत नाही..!!

तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,

तर ती परिस्थितीवर केलेली

मात असते..!!

¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿¿

*वाचा विनोद*

संताला आपला कुत्रा विकायचा होता. आणि बंता त्याला विकत घेणार होता.

बंता : हा कुत्रा विश्वासू तर आहे ना?

संता : हो आहेना, मी याला आतापर्यंत तीनदा विकलेले आहे, पण तो एवढा विश्वासू आहे की

प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो.

Thursday, June 3, 2021

काही आधुनिक म्हणी


1) आपला तो खोकला, दुसर्‍याचा तो कोरोना.

2) थांब लक्ष्मी, हातावर सॅनिटायजर देते.

3) कोरोनाचं पोर, अख्ख्या गावाला घोर.

4) गर्वाचे घर लॉकडाउन.

5) माणसाची धाव किराणा दुकानापर्यंत.

6) नवरा वैतागला लॉकडाउनने, बायको वैतागली स्वयपाकाने

7) आधी पोटोबा आणि नंतर पण पोटोबा

8) इकडे बायको तिकडे पोलिस

हसा, टेन्शन कमी होईल….प्रतिकारशक्ती वाढेल…

♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀

प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात असे नाही… काही दुखणी कुटुंब आणि मित्र मंडळी यांच्या बरोबर हसण्या आणि खिदळण्यानेही बरी होतात…

♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂

माणसे घर बदलतात, कपडे, राहणीमान बदलतात, नाते बदलतात, मित्र बदलतात, तरी देखील अस्वस्थ का राहतात? कारण ते स्वता: बदलत नाही!

πππππππππππππππππππππ

मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं, म्हणजे मोठं होत कि नाही ते माहित नाही. पण चांगल्या लोकांच्या सोबतीत राहून नक्कीच मोठं होता येतं!

♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀

विनोद ऐका

एक वृद्ध एकदा दातांच्या डॉक्टरांकडे गेला. त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी त्यांना मोठा आ आ आ करायला सांगितले. कितीही मोठा केला तरी ते अजून मोठा करायला सांगायचे. वृद्ध व्यक्ती म्हणाली.

"तोंडात बसून काढणार असाल तर ती पायातली चप्पल आधी काढा!"

Monday, May 31, 2021

गोष्ट खूप छोटी असते हो….


तुम्ही गाडीतून जातांना, न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला तर बर्‍याचदा तो मिळतच नाही, पण उतरून जर, दादा पत्ता सांगता का? असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला, तर नातं नक्कीच जुळतं…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

अंधारात तुम्ही कधी पाय अडखळून पडलात, तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं, तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात. पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून तिला मदत केली तर, तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो. कधी त्याला ग्लोव्हज द्यायचे. कधी स्कीनचं मलम देऊन टाकायचं…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

कमी जागेत बाईक पार्क करतांना तिरक्या स्टँडवर न लावता, सरळ स्टँडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली, तर त्याचं थँक यू ऐकायला मस्त वाटतं…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

किराणा दुकानाच्या गर्दीत, तिने घेतलेल्या सामानाचा ढीग पाहणार्‍याने त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली, तर सामान नीट ठेवणं तिला सोप्पं जातं.

माणसा-माणसांतील निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

®®®®®®®®®®®®®®®®®®

योगायोग आणि मनाला पडलेला प्रश्न

या वर्षी एकही पाणी टंचाईची बातमी नाही…..

मे महिना संपत आला तरीपण कुठल्या धरणात किती टक्के पाणी आहे याची साधी माहीती चौकशीपण नाही….

ना टँकर, ना पाण्यासाठी

वणवण ….

उलट घरी असल्याने,स्वच्छतेमुळे पाण्याचा वापर जास्त….

मग दरवर्षी खरंच पाणी टंचाई असते का?

ती निर्माण केली जाते?

एक विचार करण्यासारखी गोष्ट…

®®®®®®®®®®®®®®®®®®®

खिशाचे वजन वाढवता वाढवता जर नात्यांचे वजन कमी झाले तर समजून घ्या की व्यवहार तोट्याचा आहे. कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही संपत्ती तिष्ठेपेक्षा पण खूप मोठी असते.

&&&&&&&&&&&&&&&&&&&&

शिक्षक : बंड्या, ‘मुलगी खाली उभी आहे’ हे वाक्य इंग्रजीत बोलून दाखव.

बंड्या : सोप्पं आहे सर…

“Mis-Under-standing….

Friday, May 28, 2021

कोरोनाकाळात सायकल उद्योग तेजीत


गेल्या वर्षभरात देशात कोरोनाचे संकट थैमान घालत असल्याचे सगळ्यांना माहिती आहे. या काळामध्ये नागरिकांच्या सार्वजनिक आयुष्यावर मोठ्या प्रमाणावर निबर्ंध लादण्यात आले. लॉकडाउनमुळे कोट्यवधी लोकांना घरातच बसावे लागले. अजूनही अनेक राज्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात लॉकडाउनचेच निबर्ंध लागू आहेत. या पार्श्‍वभूमीवर इतर असंख्य उद्योगांचे आलेख खालच्या दिशेने येत असताना भारतातील सायकल उत्पादन उद्योगाला सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच ऐन कोरोना लॉकडाउन काळात देशात सायकलींची मागणी तब्बल २0 टक्क्यांनी वाढली आहे. क्रिसिल या उद्योगांना मानांकन देणार्‍या संस्थेकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या दशकभरात सायकल उद्योगात नोंद करण्यात आलेली ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे.

क्रिसिलने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात सायकलींची मागणी १ कोटी २0 लाखांच्या आसपास होती. मात्र, चालू आर्थिक वर्षांत त्यामध्ये १ कोटी ४५ लाखांपर्यंत वाढ होईल. लोकांमध्ये फिटनेसविषयी आलेली जागृकता आणि कोरोना काळात घरीच बसल्यामुळे असलेला बराचसा मोकळा वेळ यासाठी कारणीभूत ठरल्याचे देखील निरीक्षण क्रिसिलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

उत्पादित केल्या जाणार्‍या सायकलींचे साधारणपणे ४ प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. यामध्ये स्टँडर्ड, प्रिमियम, किड्स आणि एक्स्पोर्ट अशा चार प्रकारांचा समावेश आहे. यापैकी स्टँडर्ड प्रकारच्या सायकलींची मागणी एकूण मागणीच्या साधारण ५0 टक्के असते. या प्रकारच्या सायकली थेट सरकारकडून खरेदी करून विविध प्रकारच्या योजनांमध्ये त्यांचे वाटप केले जाते. त्यानंतर प्रिमियम आणि किड्स या दोन प्रकारच्या सायकलींच्या मागणीचे प्रमाण ४0 टक्क्यांच्या घरात आहे. फिटनेस आणि मोकळा वेळ या कारणांमुळे या प्रकारच्या सायकलींची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यानंतर एक्स्पोर्ट आणि इतर प्रकारच्या सायकलींसाठीच्या मागणीचे प्रमाण १0 टक्के आहे.

क्रिसिलने म्हटल्याप्रमाणे, सायकल उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या. एक म्हणजे प्रिमियम आणि किड्स प्रकारच्या सायकलींसाठीची मागणी तब्बल ५0 टक्क्यांपर्यंत वाढली. दुसरे म्हणजे प्रिमियम आणि किड्स या प्रकारच्या सायकलींची मागणी त्यांच्या किंमतीनुसार फारशी कमी-जास्त होत नाही. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये जवळपास ६0 ते ६५ टक्के हिस्सा असलेल्या स्टीलसारख्या कच्च्या मालाच्या किंमतीत बदल झाला, तरी देखील तो खर्च किंमतीमध्ये वाढवण्यात उत्पादकांना कोणतीही अडचण येत नाही. यामुळे एकूणच सायकल उत्पादकांचा व्यवसाय वाढण्यास मदत झाली आहे.