शांत डोहावर कधी विश्वास ठेवू नये.. खोल बरंच काही कुजलेलं मिळतं. उथळ वाहणारं नितळ पाणीच उत्तम, पिण्यायोग्य असतं. माणूसही तसाच असावा! त्याच्या स्वभावात खळखळाटच असावा असं नाही, पण कमालीचा शांतपणा मात्र मुळीच नसावा, कधी कधी या सायलेंटखाली त्याचं दबलेलं पूर्वआयुष्य मिळेल. उलट कधी पूर्णत: घमेंड, कुजकेपण याचा दर्प खोल आत दिसेल. सतत वाहत रहावं नितळ झऱ्यासारखं, लोकं म्हणू देत उथळ पाण्याला खळखळाट फार... तो खळखळाटच पाणी शुद्ध ठेवतो. डोह कधी कधी तळाशी घमेंड, कुजकेपणा या असल्या पदार्थांनी कुजका निघू शकतो. बेफिकीरपणे मांडावं, आपण आहोत तसे. लोकं मग ठरवतील तुमचा बरे वाईटपणा... स्वच्छंदीपणा हवा जगण्यात वागण्यात फक्त नैतिकतेचा लगाम हवा त्याला.. बाकी उधळा जगणं मुक्त हस्ताने... आयुष्य फार सुंदर आहे, ते असं कुजकेपणाणे कुणी वाया घालू नये बिनधास्त तारीफ करा, एखाद्या सुंदरतेची एखाद्या फुलाची, वेलाची, निसर्गाची आणि सुंदर एखाद्या मुलीचीही बरं का.. तिला तिची सुंदरता कळू द्या.. आवडली तर आवडली म्हणा, बिनधास्त... सगळे विकार अपेक्षा बाजूला ठेवुन मात्र..!
कुद्न मुळीच जगू नका, आयुष्य विश्वाचा वेळ पाहता फक्त तसूभर आहे... दिलखुलास जगा. सगळं उपभोगलं पाहीजे. थरार, आनंद, सुंदरता, आव्हानांना सामोरं जाण्यात आणि त्यानंतरच्या जिंकलेपणात जो आनंद असतो तोसुद्धा वेचता आला पाहीजे. डब्यासारखं एकाच ठिकाणी बसून जमत नाही. चारीआर मनाला घुमवलं पाहीजे. वैराग्याची भगवी वस्त्रे कधीच परिधान करु नका. कारण ती घातल्याने आतल्या चेतना मरत नाहित. सर्व आसक्ती जीवंत असू द्या, त्या जिवंत असणं हे आपण जिवंत असण्याचं लक्षण आहे. त्यांना फक्त सुंदरतेची झालर असू द्या, मग त्यांचं उपभोगणंही सुंदर होऊन जाईल. जगणही सुंदर होवून जाईल! खळखळत जगा.. नितळ झऱ्यासारखं शुद्ध..!!
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
'स्त्री'
एका संध्याकाळी सूर्य बुडत असतांना तिला तिच्या नातीने विचारले,"आज्जी, स्त्री म्हणजे काय असते गं ?"
सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याने, मोतीबिंदू झालेल्या डोळ्याने ती झट्कन बोलली,
"स्री सुद्धा मनुष्य असते. तिला तिचे आयुष्य असते
तुडवली तर नागीण असते.
डिवचली तर वाघीण असते.
कडाडली तर वीज असते.
तान्ह्या बाळाची नीज असते.
आणि बरं का पोरी, तिच्याच गर्भात भविष्याचे बीज असते!"
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
पेशंट : डॉक्टर, मला नवीन त्रास सुरू झालाय.
मी दुसरं वाक्य बोललो की, पहिलं वाक्य विसरुन जातो.
डॉक्टर : हा त्रास तुम्हाला कधीपासून आहे ?
पेशंट : कसला त्रास ?
No comments:
Post a Comment