Sunday, September 9, 2018

राज्य ग्रंथालय संघाच्यावतीने 19 ला धरणे आंदोलन

राज्य ग्रंथालय संघाच्यावतीने 19 ला धरणे आंदोलन

जत,(प्रतिनिधी)-
    राज्य सरकार  सार्वजनिक ग्रंथालये आणि सेवक यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी चालढकल करत असल्याने राज्य ग्रंथालय संघाच्यावतीने राज्यभर प्रत्येक जिल्ह्याच्या  जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर 19 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील ग्रंथालये यादिवशी बंद ठेवून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा संघाचे अध्यक्ष एकनाथ जाधव यांनी केले आहे.
   श्री.जाधव म्हणाले,महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ व्यवस्थापक मंडळाची सभा दि. 1सप्टेंबर 2018 रोजी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम या ठिकाणी संपन्न झाली.सदर सभेमध्ये सार्वजनिक ग्रंथालये व सेवक यांच्या प्रश्नांची सोडवणूक न केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 19 सप्टेंबर रोजी एका दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात यावे असे ठरले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालये बंद ठेऊन  जिल्हाधिकारी कार्यालय ,सांगली येथे सकाळी 11 वाजता सर्व ग्रंथालयाचे पदाधिकारी, संचालक मंडळ,ग्रंथालय सेवक तसेच जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, संचालक मंडळ,जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी, संचालक मंडळ या सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून आंदोलन शांततेत पार पाडून यशस्वी करावे, असे आवाहन केले.
   यावेळी  सांगली जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह भगवानराव शिंदे, सांगली जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ कृती समितीचे अध्यक्ष विनोद ठोंबरे,संघाचे जत तालुकाध्यक्ष राजेंद्र खांडेकर,सचिव अमर जाधव उपस्थित होते.

व्हॉटस् अ‍ॅप कट्टा:लग्न म्हणजे काय असतं?


   
 लग्न म्हणजे काय असतं?
तिने कसाही स्वयंपाक केला तरी त्यालामस्तम्हणायचं असतं...!
 लग्न म्हणजे काय असतं...!
क्रिकेटमध्ये कितीही इंटरेस्ट नसला तरी त्याच्यासाठी ते एन्जाय करायचं असतं...!!
 तुळशीबागेत जायचा कंटाळा आला असला तरी तिच्यासोबत आनंदाने जायचं असतं...!!!
लग्न म्हणजे काय असतं...!
तो कितीहीम्हाताराझाला तरी त्याला चिरतरूण भासवायचं असतं...!!
मी जाड झालेय का...?‘ या वाक्याला कधीहीहोम्हणायचं नसतं...!!!
 लग्न म्हणजे काय असतं...?
 दोन्ही घरच्या नात्यांना आपुलकीने जपायचं असतं...!
 वेळप्रसंगी आपल्या इच्छांना हसत हसत विसरायचं असतं...!!
थोडक्यात काय?
 लग्न लग्न म्हणजे काय असतं?
 छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये केलेलं कॉमप्रमाइज असतं...!
कारणवी व्हील गो ओल्ड टुगेदरअसं एकमेकाला केलेलं प्रॉमिस असतं...!!
लग्न हे सुद्धा अंदाजावर जन्म घेणारेच नाते असते...!
 तिथली आकडेवारी ही चुकायचीच...!!
पण आपला साथीदार हा इतकाही वाईट नाही
हे जितक्या कमी वेळात जाणून घ्याल, तितक्या जास्त वेळाचा
 सुखाचा संसार पुढे आपली वाट पाहत असतो!
शब्दांच्या चकमकीत नाती मारली जातात!
शब्दांची ओंजळ बनवा! थोडंसं गळेल पण तुटणं टळेल!
लग्नानंतर खरंतर आपल्या जोडीदाराला
मिठीत ठेवण्यासाठी धडपड व्हायला हवी,
पण इथेमिठीतनाही तरमुठीतठेवण्यासाठी धडपड चालू असते!
संसार हे मुठीचे नाही तर मिठीचे प्रकरण आहे
हे ज्यांना कळले, ते संसारात जिंकतात...!


 एकही शिवी न देता (उघडपणे किंवा मनातल्या मनात) जर तुम्ही जतमध्ये फोर व्हीलर चालवली. तर समजून घ्या की तुम्ही आपल्या अंतरात्म्याला काबूत आणले आहे. बाकी योगा, मेडिटेशन सब बकवास आहे!

 *****
मुलगा : ‘आय लव्ह यू
मुलगी : आय हॅव अ बॉयफ्रेन्ड
मुलगा (मोबाईल काढून) : हॅलो, राम कदम...
 मुलगी : आय लव्ह यू टू



अंगणवाडी केंद्रातून किशोरी मुलींना देण्यात येणारा आहार बंद

जत,(प्रतिनिधी)-
 ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींसाठी असलेली गरम ताजा व सकस आहार पुरवठा करण्याची योजना केंद्रातील मोदी सरकारने गुंडाळली असून अंगणवाडी केंद्रातून किशोरी मुलींना होत असलेला आहार पुरवठा 1 सप्टेंबरपासून बंद करण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त इंद्रा माला यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकार्यांना किशोरी मुलींना सुरू असलेला आहार पुरवठा बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे.
     किशोरवयीन मुलींचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील 11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींना किशोरी शक्ती योजनेतून गरम ताजा आणि सकस आहार देण्यात येत होता. याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर होती. अंगणवाडी केंद्रात येणार्या बालकांबरोबरच किशोरवयीन मुलींसाठीही सकस आहार तयार करण्यात येत होता. दररोज हा आहार किशोरवयीन मुलींना देण्यात येत होता. परंतु केंद्र सरकारने अचानकच ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना बंद झाल्याने किशोरवयीन मुलींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
     मुलींसाठी बनविण्यात येत असलेल्या आहाराकरिता अनुदान मिळणार नसल्याने राज्य सरकारनेही आपले हात झटकले आहेत. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने 1 सप्टेंबरपासून आहार पुरवठाच करू नका, असा आदेश काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोदी सरकारच्या योजना बंद करण्याच्या या निर्णयाचा ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना फटका बसणार आहे. या निर्णयाबाबत किशोरी मुलींच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत विरोधी पक्षांनी आवाज उठविण्याची अपेक्षाही पालकांतून व्यक्त  होत आहे.

अभ्यासक्रमाचा स्तर सीबीएसईच्या धर्तीवर


दहावी व बारावीच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात होणार बदल

जत,(प्रतिनिधी)-
अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज्य शिक्षण मंडळाने अभ्यासक्रम बदलाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणार्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार दहावीचा बदललेला अभ्यासक्रम आणि बारावीच्या भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात बदल करण्यात येणार असल्याची माहिती बोर्डातील सूत्रांनी दिली आहे.
     बालभारतीच्या विविध विषयांच्या अभ्यासमंडळाच्यावतीने यंदा दहावीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यानुसार बालभारतीच्या विषयतज्ज्ञांनी नव्या बदलाच्या माध्यमातून राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या स्तराचा करण्यासाठी प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जेईई व नीट आदींसारख्या परीक्षांची वेगळी तयारी करावी लागणार नाही. गेल्या काही वर्षांत राज्य मंडळाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली असून सीबीएसईकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढला आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी मंडळाकडून अशा प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याचेदेखील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
या मूल्यमापन आराखड्यानुसारच प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलण्यात येणार आहे. याची शिक्षकांना माहिती देण्यासाठी शिक्षण मंडळाच्यावतीने सप्टेंबर महिन्यात विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत राज्यभरातील ठरावीक शिक्षकांना बोलविण्यात येणार आहे. दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमातील प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची ही नवी पद्धत वर्तमान पद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न असेल. विशेषत्वाने भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न वेगळे असतील. मिळालेल्या माहितीनुसार नवीन पद्धतीत कृतिपत्रिकेवर आधारित प्रश्नांचा भर राहणार असून उपयोजनात्मक प्रश्नांवर भर देण्यात येणार आहे. हे प्रश्न तयार करत असताना विद्यार्थ्यांच्या अभ्यास व लेखनकौशल्याचे आकलन केले जाणार आहे.
इयत्ता दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसारच कृतिपत्रिकांवर आधारित प्रश्नपत्रिका असणार आहेत. बदललेल्या अभ्यासक्रमाचे शिक्षकांना विद्या प्राधिकरणाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच इयत्ता बारावीच्या भाषा विषयांसाठीदेखील कृतिपत्रिका लागू करण्यात आल्यामुळे या विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातदेखील बदल करण्यात येणार आहेत.


गोळी मारायची तर मला मार : शिरीषकुमार


     पाताळगंगा नदीच्या काठी चार डोंगराच्या कुशीत वसलेल्या नंदनगरी अर्थात नंदुरबार शहराची पूर्वापार ओळख ही व्यापार्‍यांची वसाहत म्हणूनच. या गावात ९ सप्टेंबर १९२६ मध्ये एका व्यापार्‍याच्या घरात शिरीषकुमारांचा जन्म झाला. त्याच्यासह पाच संवगड्यांनी स्वातंत्र्य लढय़ात प्राणाची आहुती दिली. त्यामुळे या गावाचे नाव देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचले. नंदुरबार हे आता कुठे अंदाजे एक लाख लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. परस्परांना ओळखणारे आणि स्नेह जाणणारे लोक आहेत. 
     घराघरांतून चालणारा व्यापार आणि देवाणघेवाण हे महत्त्व जाणून पूर्वापार अनेक ज्येष्ठ प्रवाशांनी या गावाला भेटी दिल्या आहेत. प्रसिद्ध प्रवासी ट्वेनियरने १६६0 ला श्रीमंत आणि समृद्धनगरी असे नंदुरबारचे वर्णन केले आहे, तर नंद नावाच्या गवळी राजाने हे गाव वसविल्याची आख्यायिका आहे. नंदुरबारमध्ये बाळा शंकर इनामदार नावाचे एक व्यापारी होते. त्यांचा तेलाचा व्यापार होता. त्यांना मुलगा नसल्याने ते काहीसे दु:खी होते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह केला. त्यांना कन्याप्राप्ती झाली. ही कन्या त्यांनी पुष्पेंद्र मेहता यांना सोपवली. १९२४ ला पुष्पेंद्र व सविता यांचा विवाह झाला. २८ डिसेंबर १९२६ ला या दाम्पत्याच्या पोटी, मेहता घराण्यात शिरीषकुमारचा जन्म झाला.  
     देशातील गावे व शहरांप्रमाणेच नंदुरबारचेही वातावरण स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भारलेले होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सामान्यांनी काय करायचे तर हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभातफेरी, मशाल मोर्चे काढायचे. देशप्रेमांनी ओतप्रोत घोषणा द्यायच्या. नंदुरबारमधील अशा कामात मेहता परिवाराचा सहभाग होता. शिरीष वयपरत्वे शाळेत जाऊ लागला होता आणि त्याच्यावर महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा प्रभाव होता. महात्मा गांधींनी ९ ऑगस्ट १९४२ ला इंग्रजांना 'चले जाव'चा आदेश दिला. महिनाभरानंतर, ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता. गुजराथी मातृभाषा असलेल्या शिरीषने घोषणा सुरू केल्या, 'नहीं नमशे, नहीं नमशे', 'निशाण भूमी भारतनु'. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. 
     मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. शिरीषकुमारच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि 'भारत माता की जय'चा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलिस अधिकार्‍याने मिरवणुकीत सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा त्या अधिकार्‍याला एका चुणचुणीत मुलाने सुनावले, 'गोळी मारायची तर मला मार!' ती वीश्री संचारलेला मुलगा होता, शिरीषकुमार! संतापलेल्या पोलिस अधिकार्‍याच्या बंदुकीतून सुटलेल्या, एक, दोन, तीन गोळ्या शिरीषच्या छातीत बसल्या आणि तो जागीच कोसळला. 

कादंबरी लेखनतंत्राचा किमयागार : लिओ टॉलस्टॉय


     सुप्रसिद्ध रशियन लेखक, तत्त्वज्ञ, प्रचारक आणि सुधारक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म ९ सप्टेंबर १८२८ रोजी तूला प्रांतातील यास्नया पल्याना या जहागिरीच्या ठिकाणी एका श्रीमंत सरदार घराण्यात झाला. कझ्ॉन विद्यापीठात १८४४ ते १८४७ पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी कॉकेशसमध्ये सैन्यात नोकरी केली. क्रिमियन युद्धात सिव्हॅस्तपोलच्या लढाईत त्यांनी भाग घेतला. त्यानंतर मुख्यत: मॉस्को व पीटर्झबर्ग येथील आपल्या घराण्याच्या जहागिरीच्या ठिकाणीच राहिले. १८६२ मध्ये त्यांचा सोन्या (सोफ्या)या मध्यमवर्गीय मुलीशी विवाह झाला होता. विवाहोत्तर पहिली १५ वर्षे सुखाची गेली. या काळात त्यांना १३ अपत्येही झाली. तथापि त्याने स्वीकारलेल्या विशिष्ट धार्मिक-नैतिक जीवननिष्ठेमुळे त्याच्या कौटुंबिक जीवनात ताण निर्माण झाले. १८५२ मध्ये प्रकाशित झालेली टॉलस्टॉयची पहिली लेखनकृती द्येत्स्त्व ही त्याच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथत्रयीचा पहिला भाग होती; या कृतीतून तरुण टॉलस्टॉयच्या बुद्धीची व विचारांची प्रगल्भता लगेच नजरेस येते.

     आत्मचरित्राचे दुसरे दोन भाग, ओत्रोचिस्त्व आणि यूनत्स, अनुक्रमे १८५४ व १८५६ मध्ये प्रसिद्ध झाले. या त्रयीत, त्याचप्रमाणे उत्रो पमेश्शिका आदी आपल्या आधीच्या लेखनकृतींतून टॉलस्टॉयने सामान्य माणसाचे जीवन आणि सरदार-जमीनदार आदींशी त्याचा संघर्ष यांचे चित्रण करण्यावरच आपले लक्ष केंद्रित केले आहे. क्रिमियन युद्धात प्रत्यक्ष भाग घेतल्यामुळे आपल्या सिवास्तोदील्स्कीये रस्काझी (सिव्हॅस्तपोल स्टोरीज)मध्ये सदर युद्धाचे यथार्थ चित्र रेखाटण्यास त्यास मदत झाली. युद्धासंबंधीचा लेखी पुरावा या दृष्टीने या कथांचे महत्त्व आहेच; पण त्याशिवाय या कथांतून सदर युद्धातील वीरांच्या मनोव्यापारांचे ठळक विेषणही केलेले दिसते. हाच प्रकार १८६३ साली तरुण टॉलस्टॉयने लिहिलेल्या कझाकी (कोसॅक्स) या महत्त्वाच्या कादंबरिकेबाबतही प्रत्ययास येतो. शिक्षण आणि शिक्षणशास्त्र यांवर तरुण टॉलस्टॉयची निश्‍चित मते होती. 
     आपले विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी यास्नया पल्याना येथे १८४९ मध्ये त्याने शेतकर्‍यांच्या मुलांसाठी एक शाळा सुरू केली आणि यास्नया पल्याना याच नावाच्या नियतकालिकात त्यांनी १८६२-६३ या काळात अनेक लेख लिहिले. १८६३ ते १८६९ या काळात टॉलस्टॉयने आपली राष्ट्रीय महत्त्वाची प्रदीर्घ कादंबरी वॉर अँड पीस ही लिहिली. टॉलस्टॉयचा असा विश्‍वास होता, की असल्या गोष्टींत व्यक्तींना काही महत्त्व नसते; त्या अगदी नेपोलियन आणि कुतूझपसारख्या सेनानींइतक्या महत्त्वाच्या व शक्तिमान असल्या तरीही. इतिहासाकडून टॉलस्टॉय अँना करेनिना (१८७५-७७) या आपल्या पुढील कादंबरीत समकालीन समाजाकडे वळलेला दिसतो. या कादंबरीत सरदार घराण्यात जन्मलेल्या. परंतु, महत्त्वाकांक्षा आणि वैयक्तिक अहंभावाने पछाडलेल्या उच्चभ्रू समाजाच्या ढोंगी नीतिमत्तेविरुद्ध लढा देणार्‍या एक रशियन स्त्रीची करुण कहाणी आहे. 
     सामाजिक अंतर्विरोधांवर अचूक बोट ठेवून टॉलस्टॉयने हे दाखवून दिले आहे, की अँनासारख्या संवेदनशील, उत्साही व चैतन्यशील जीवाचा तत्कालीन रशियन समाजातील परिस्थिती व भेदक वास्तवता कसा कोंडमारा करून टाकते. तिचे आत्यंतिक दु:ख आणि करुण शेवट यांमागचे प्रमुख कारण हेच होते. एक माता व प्रणयी स्त्री या नात्यांनी तिच्या मनात होणार्‍या झगड्याचे टॉलस्टॉयचे वर्णन अत्यंत हेलावून सोडणारे आहे. टॉलस्टॉयच्या लेखनाकृती म्हणजे जागतिक वाड्मयातील वास्तववादी चित्रणाच्या प्रगतीचा कळस आहेत. जीवनाचे खरे सारसर्वस्व त्यात चित्रित केलेले दिसते. तो कादंबरी लेखनतंत्राचा अप्रतिम किमयागार आहे. 

व्हॉटस् अ‍ॅप कट्टा: पूर्वीचा काळ



पूर्वीचा काळ बाबा खरंच होता चांगला,
 साधे घरं साधी माणसं कुठे होता बंगला ?
घर जरी पत्र्याचे तरी माणसे होती मायाळू,
साधी राहणी चटणी-भाकरी देवभोळी अन् श्रद्धाळू!
सख्खे काय चुलत काय सगळेच आपले वाटायचे,
सुख असो दुःख असो आपुलकीने भेटायचे !
 पाहुणा दारात दिसला की खूपच आनंद व्हायचा हो !
हसत-खेळत गप्पा मारून शीण निघून जायचा हो !
श्रीमंती जरी नसली तरी एकटे कधी वाटले नाही,
खिसे फाटके असले तरीही कोणतेच काम थाबंले नाही.
उसने-पासने करायचे पण पोटभर खाऊ घालायचे
पैसे-आडके नव्हते तरीही मनमोकळं बोलायचे!
कणकीच्या उपम्यासोबत गुळाचा शिरा असायचा
पत्रावळ जरी असली तरी पाट, तांब्या मिळायचा
 लपाछपी आबाधाबी, बिनपैशाचे खेळ हो
कोणीच कुठे नव्हते होता वेळच वेळ हो !
चिरेबंदी वाडेसुद्धा खळखळून हसायचे
निवांत गप्पा मारीत माणसं ओसरीवर बसायचे
सुख शांती समाधानतेआता कुठे दिसते का?
पॉश पॉश घरांमध्येतशीमैफिल सजते का?
नातेगोते घट्ट होते किंमत होती माणसाला,
 प्रेमामुळे चव होती अंगणातल्या फणसाला.
तुम्हीच सांगा नात्यामध्ये राहिला आहे का राम?
भावाकडे बहिणीचा असतो का हो मुक्काम?
सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी कुणीच कुणाला बोलत नाही,
मृदंगाच्या तालावरती गाव आता डोलत नाही!
 प्रेम, माया, आपुलकी हे शब्द आम्हाला गावतील का?
 बैठकीतल्या सतरंजीवर पुन्हा पाहुणे मावतील का?
तुटक तुसडे वागण्यामुळे मजा आता कमी झाली
श्रीकृष्णाच्या महालामधुनी सुदामाची सुट्टी झाली
हॉल किचन बेडमध्ये प्रदर्शन असते वस्तुंचे
का बरे, विसर्जन झाले चांगुलपणाच्या अस्थींचे!

 *****

ऑफिसमधून थकून घरी आल्यावर मुलाने गुणपत्रिका पुढे केली.
 मराठी 38, इंग्रजी 35, गणित 40 पुढचे काही वाचण्यपूर्वीच मी ओरडलो, ‘गाढवा, लाज वाटते का काही? दगड आहेस नुसता दगड !‘
पत्नी : अहो, पण जरा ऐकता का?
मी : तू गप्प बस ! तूझ्या लाडानेच वाया जातो आहे तो.
नालायका! अरे बाप राबतो आहे आणि तुम्ही असे गुण उधळा!
 मुलगा खाली मान घालून गप्प. पत्नी : ‘अहो...‘
मी : ‘तू एक शब्द मध्ये बोलू नकोस...’
(शेवटी पत्नी चिडून) ’ऐका न जरा! सकाळी माळा साफ करताना सापडलेली तुमचीच गुणपत्रिका आहे ती.‘
 मग काय? भयाण शांतता