जत,(प्रतिनिधी)-
जत येथील के.एम.हायस्कूल आणि ज्युनीअर कॉलेज तसेच शारदा विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला स्नेहसंमेलन मेळावा व वार्षिक क्रीडा स्पर्धा यांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्रमुख पाहुणे म्हणून जत पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सौ.वर्षा डोंगरे उपस्थित होत्या.
सलग तीन दिवस चाललेल्या क्रीडा स्पर्धांसह विविध कलागुणांना वाव देणार्या झालेल्या स्पर्धा आणि स्नेहसंमेलन मेळावा यांची सांगता या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाने झाली. यावेळी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पार पडले.तालुका,जिल्हा,राज्य आणि आंतरराज्य क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंबरोबरच शालेय स्तरावर हस्ताक्षर,वेशभुषा,निबं ध,चित्रकला,वक्तृत्व,बौद्धिक अशा विविध स्पर्धांमध्ये क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी बक्षीस,पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक सौ.वर्षा डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले,कोणतीही गोष्ट आजची उद्यावर ढकलू नका.आजचे काम आजच करा. कष्ट करा,जिद्द बाळगा त्यामुळे तुम्हाला सहज यश मिळून जाईल. वाचन भरपूर करा, हे सांगतानाच त्यांनी आपला आवडीचा छंद जोपासा.कष्ट करण्याच्या दिवसात कष्ट करा. मोबाईल,संगणक आणि टीव्ही याचा अतिरेक टाळा. त्यागोष्टी आपल्यासाठी आहेत. त्याचे गुलाम होऊ नका,असे आवाहनही त्यांनी केले.प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती एम.डी.तवटे यांनी केले. सूत्रसंचालन विजय बिराजदार व सुरेखा हंकारे यांनी केले.आभार मुख्याध्यापक आर.एम. सय्यद यांनी मानले.यावेळी दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष धानाप्पा पट्टणशेट्टी,डॉ.मनोहर मोदी,डॉ.विजय पाटील,शिवलिंगापा संख,हिट्टी,चंद्रशेखर गोब्बी,माजी मुख्याध्यापक श्री.उदगिरे,कुंभार,बिराजदार सर,श्री.माचेट्टी,शारदा विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे,सौ.सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment