जत,(प्रतिनिधी)-
आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य रांगोळी स्पर्धेचे वितरण जत येथील रामराव विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये समारंभपूर्वक घेण्यात आले. यावेळी रामपूरचे माजी सरपंच मारुती पवार, जत तालुका काँगेस सेवादलचे अध्यक्ष मोहन मानेपाटील, लेखक मच्छिंद्र ऐनापुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जत विधानसभेचे आमदार आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जत शहरात भव्य प्रमाणात विविध गटात रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. जत हायस्कूल, बालविद्यामंदिर, आणि रामराव विद्यामंदिरसह अनेक शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे बक्षीस वितरण विजेत्या विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये करण्यात आले.
रामराव विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील कु. श्रेया रवींद्र साळे (6 वी), कु.राखी गोरखनाथ साळे (7वी), कु.सृष्टी उत्तम बिरुगणे (5वी), कु. अक्षता अशोक दुधाळ (5वी), कु.सोनाली रामलिंग कोटी (6वी), कु.समृद्धी शंकर घोडके (8वी), कु.श्रेया बाळू शिंदे (8वी) या विद्यार्थीनींनी विविध गटात यश मिळवले.त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना मोहन मानेपाटील म्हणाले, विक्रम प्रतिष्ठान आणि काँग्रेसच्यावतीने विविध स्पर्धा, उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपले कलागुण बहरत न्यावेत. लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांनी मुलांनी विद्यार्थी दशेतच आपला छंद आणि हिरो निवडावा असे आवाहन केले. यावेळी पर्यवेक्षक संजीव नलावडे, जितेंद्र शिंदे, सुभाष शिंदे, वसंत जाधव, शरद जाधव, सचिन चव्हाण उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक बबन संकपाळ यांनी केले . आभार जितेंद्र शिंदे यांनी मानले.
No comments:
Post a Comment