उमदी येथील समता आश्रमाशाळेचा 12 वी चा निकाल 94 टक्के
जत,(प्रतिनिधी)-
सर्वोदय शिक्षण संस्था उमदी संचलित समता माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनियर कॉलेजचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल ९४ टक्के इतका लागला आहे .
प्रथम तिन आलेले विद्यार्थ्यी व त्याना मिळालेली टक्केवारी खालील प्रमाणे आहे . कला शाखेत विशेष यश संपादन केलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत प्रथम राजश्री नावी ८८ टक्के , द्वितीय जयश्री निंबर्गी ८५ टक्के , तृतीय मल्लिकार्जुन पुजारी ८४ टक्के याप्रमाणे आहेत.
Sunday, June 2, 2019
जत तालुक्यातील 73 गावांमध्ये खासदार पाटील यांना आघाडी
काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज;वंचित आघाडीची दमदार सुरुवात
जत,(प्रतिनिधी)-
जत विधानसभा मतदार संघातील १२३ पैकी ७३ गावात खासदार संजयकाका पाटील यांना आघाडी मिळाली आहे तर ४५ गावात बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. पाच गावात आघाडीचे उमेदवार विशाल पाटील आघाडी मिळाली आहे. या लोकसभा निवडणूक निकालाचे आगामी विधानसभा निवडणुकीवर दुरगामी परिणाम होणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आत्मपरीक्षण करण्यास सुरुवात केली आहे.

ग्रामसभेत केला ग्रामसेविकेचा विनयभंग
जत,(प्रतिनिधी)-
शासकीय कामात अडथळा आणला व शिवीगाळ करून विनयभंग केल्याच्या आरोपावरून वायफळ ( ता.जत ) येथील ग्रामपंचायत उपसरपंच किरण बापू यादव व सरपंच मालती चव्हाण यांचा मुलगा अण्णासाहेब चव्हाण यांच्यासह अकरा जणांच्या विरोधात ग्रामसेविका योगेश्री माणीक कुंभार ( वय २९ ) यानी आज जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे . याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही .ही घटना काल सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान वायफळ ग्रामपंचायत कार्यालयात घडली आहे.

लॉटरी लागल्याचे सांगून 31 लाखाला गंडविले
जत,(प्रतिनिधी)-
तुम्हाला सॅमसंग गॅलेक्सी नॅशनल लॉटरीमध्ये दोन कोटी 65 लाखांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून जत तालुक्यातील उमराणी येथील श्री साई कृषी सेवा केंद्राचे मालक अनिल ईश्वर वाली ( वय 40) यांना जॅन स्टीफन या व्यक्तीने 31 लाख 30 हजाराला गंडविल्याचे उघड झाले आहे. लॉटरीतील अडीच कोटी मिळवण्याच्या अमिषापोटी अनिल वाली यांनी स्वतः च्या खात्यावरील 31 लाख 30 हजार गमावले आहेत. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी काल पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.

बारावीनंतरच्या शिक्षणासाठी विविध पर्यायV
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांना पुढील शिक्षणासाठी कोणकोणत्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा याची माहितीच नसल्याचे दिसून येते. अशावेळी विद्यार्थी वेगळी वाट न निवडता पारंपरिक मार्ग स्वीकारतात. त्यामुळे अनेक चांगल्या संधीना ते मुकतात. त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आजच्या परिस्थितीत बारावीनंतर पुढे शिकण्यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध असल्याचे दिसून येत आहेत.
कुंभारीत साडेचार लाखांची चोरी
जत,(प्रतिनिधी)-
कुंभारी ता.जत येथील नानासो तुकाराम जाधव यांचे राहते घर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून 4 लाख 35 हाजार 100 रूपयाचा मुद्देमाल पळविला.घटना शनिवारी मध्यरात्री घडली.

जत येथील विवाहिता बेपत्ता
जत,(प्रतिनिधी)-
जत येथील मोरे कॉलनी वसाहतीतील जयश्री म्हाळाप्पा होळगूळे (वय २९) ही विवाहिता माडग्याळ (ता.जत ) येथून बेपत्ता झाली आहे. माडग्याळ येथे मुक्त विद्यापीठची परीक्षा देण्यासाठी ती गेली होती. शनिवार दि. १ मे रोजी साडे पाच वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी तिचा पती म्हाळाप्पा विठ्ठल होळगुळे यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तपास पोलीस नाईक वळसंग करीत आहेत.

Subscribe to:
Posts (Atom)